एसटीचालक सतीश देसाई यांचे उपोषण सुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 05:29 AM2020-01-29T05:29:44+5:302020-01-29T05:30:17+5:30
एसटीतील अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने सकारात्मक चर्चा करून सोमवारी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हसळा : श्रीवर्धन एसटी आगारातील चालक सतीश देसाई यांनी २४ जानेवारीपासून उपोषणाला सुरुवात केली होती. एसटीतील अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने सकारात्मक चर्चा करून सोमवारी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आगार व्यवस्थापक एम. जी. जुनेदी यांच्या जागेवर दुसरा प्रभारी अधिकारी नेमण्याच्या उपोषणकर्त्याच्या मागणीनुसार श्रीवर्धन आगारात नवीन वाहतूक निरीक्षकाची मागणी मान्य करण्यात आली आहे, तर देसाई यांच्यावरीलअन्यायाची मध्यवर्ती कार्यालयातून चौकशी आदेश दिले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एसटीचे अधिकारी ज्ञानोबा माळी व प्रवीण पाटील यांच्याबरोबर उपोषणकर्त्यांच्या वतीने कामगार सेना विभागीय सचिव विजय केळकर, संकेत नेहरकर व माणिक तांबोळी यांनी सकारात्मक चर्चा के ली.
लेखी आश्वासन
माझ्यावर अन्याय झाला होता, त्यामुळे मी उपोषणाला बसलो होतो. मात्र, मला लेखी आश्वासन दिल्याने उपोषण तात्पुरत्या काळासाठी स्थगित के लेअशी प्रतिक्रिया सतीश देसाई यांनी दिली.