एसटी कर्मचाऱ्यांची ३० टक्के वेतनकपात; ७० टक्केच पगार जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 11:55 PM2020-01-12T23:55:42+5:302020-01-12T23:55:55+5:30

तुटपुंजा पगारात कपात झाल्याने कर्मचारी मेटाकुटीला

ST employees receive a pay cut of 5 percent; Only 3% salary deposit | एसटी कर्मचाऱ्यांची ३० टक्के वेतनकपात; ७० टक्केच पगार जमा

एसटी कर्मचाऱ्यांची ३० टक्के वेतनकपात; ७० टक्केच पगार जमा

Next

संजय करडे 

मुरुड : मुरुड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याचा पगार जानेवारीत त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, तेव्हा तोही पगाराच्या ७० टक्केच जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे. ३० टक्के पगार हा आगार तोट्यात असल्याचे कारण देत ती रक्कम कमी केल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे. अशा प्रकारे अचानक पगार कपात झाल्याने एसटी कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत.

याचबरोबररायगड जिल्ह्यात आठ आगार कार्यरत असून तेथील कर्मचारीवृंदांचाही ३० टक्के पगार कपात केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. एसटी कर्मचाºयांना अगदीच तुटपुंजे वेतन मिळते आणि त्यातही कपात झाल्याने त्रस्त झाले आहेत. एसटी कर्मचारीवृंदामध्ये चालक, वाहक, तांत्रिक विभाग, लेखनिक व अधिकाºयांचा समावेश आहे. मुळातच एसटी कर्मचारीवृंदाना सर्वात कमी पगार मिळत असताना ३० टक्के पगाराची रक्कम कपात झाल्याने हैराण झाले आहेत. अचानकपणे एसटी प्रशासनाने पगार कपात करण्याचे धोरण अवलंबल्यामुळे कर्मचारी भयभीत झाले आहेत. मुरुड आगारात एसटीच्या ५६ फेºया सुरू असून महिन्याला एक कोटी ३५ लाख रुपये जमा होत असतात. यातील कर्मचारी पगारावर ३६ ते ४० लाख रुपये खर्च होत असतात. त्यामुळे सध्यातरी मुरुड आगार नफ्यात आहे असे दिसत आहे. मुरुड आगारातील मुंबई, बोरीवली, धुळे, पुणे, ठाणे व औरंगाबाद या फेºयांमधून अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे आगारचा चढता आलेख दिसत आहे. आगार नफ्यात असताना पगार कपात का? असा प्रश्न कर्मचाºयांना पडला आहे. त्यातच एसटी कर्मचाºयांचे वेतन अगदीच कमी आहे; अशी अचानक होणारी वेतनकपात त्यांना अर्थिकदृष्ट्या संकटात आणणारी आहे. दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि मुलांचे शिक्षण तुटपुंजा पगारात कसे होणार, अशा विवंचनेत येथील कर्मचारी आहेत. दैनंदिन गरजाही या तुटपुंजा पगारात भागवणे शक्य नसल्याची प्रतिक्रिया एका एसटी कर्मचाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

गेली अनेक वर्षे एसटी कर्मचाºयांचा पगार त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे; परंतु यंदाच्या या नवीन वर्षात डिसेंबरचा पगार ३० टक्क्यांनी कपात केल्याने नवीन पद्धत सुरू होणार की काय? अशा चिंतेत कर्मचारी आहेत.

मुरुड आगारात २१५ कर्मचारी
1. मुरुड आगारात चालक, वाहक, लिपिक, तांत्रिक विभाग कर्मचारी व आगार व्यवस्थापक यांच्यासह २१५ कर्मचारी कार्यरत आहेत. मुळातच एसटी कर्मचाºयांना खूप कमी पगार मिळतो. अशा परिस्थितीत ३० टक्के पगार कपात केल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
2. मिळालेल्या तुटपुंजा पगारात खोलीचे भाडे मुलांची शाळेची फी, वीजबिल कसे भरावयाचे, असा मोठा प्रश्न मुरुड आगारातील कर्मचाºयांना पडला आहे. वाढती महागाई व त्यात पगार कपात यामुळे एसटीचा कर्मचारी होरपळून गेला आहे.
3. कारण मिळणाºया पगारावर सर्वांचे मासिक नियोजन ठरत असते. त्यात कर्ज, घराचे हप्ते अशा विविध अडचणी असतात, त्यामुळे असे वेतन कपात झाले तर हा खर्च कसा करायचा? हप्ते कसे फे डायचे, अशा विवंचनेत हे क र्मचारी आहेत.

७० टक्के पगार जमा झालेत हे सत्य आहे; परंतु यामागचे कारण म्हणजे पगारवाटपाची रक्कम कमी आल्याने सध्या आम्ही कर्मचारीवृंदाना ७० टक्के पगार दिला आहे. उर्वरित ३० टक्के रक्कम १५ जानेवारीला प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार आहोत.
- अनघा बारटक्के ,
विभाग नियंत्रक, रायगड जिल्हा

Web Title: ST employees receive a pay cut of 5 percent; Only 3% salary deposit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.