अलिबाग : तालुक्यातील खंडाळे येथे एसटी आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. अपघात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला. जखमींवर अलिबागच्या जिल्हा सरकारी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटीच्या वाहकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा अपघात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झाल्याची जोरदार चर्चा रु ग्णालय पसरली होती.अलिबाग-पनवेल ही विनावाहक बस खंडाळे येथील पुलावरून खाली उतरत होती. त्याच वेळी अॅपे रिक्षा खंडाळेकडून अलिबागकडे येत होती. त्या वेळी एसटी आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यामध्ये रिक्षा पलटी झाली. रिक्षामध्ये सहा प्रवासी होते. या अपघातामध्ये आशा नाईक यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षा वाहकालाही दुखापत झाली आहे. जखमींवर अलिबागच्या सरकारी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे वृत्त समजताच रु ग्णांच्या नातेवाइकांनी रु ग्णालयासमोर गर्दी केली.बसचा वाहक सतीश गायकवाड (३८) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गायकवाड हा पनवेल तालुक्यातील आसुडगाव येथे राहणारा आहे. त्याचे मूळ गाव सातारा तालुक्यातील फलटण आहे.
एसटीची रिक्षाला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 2:57 AM