रस्त्यावरील मातीत अडकली एसटी; प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 10:42 PM2019-07-26T22:42:05+5:302019-07-26T22:42:23+5:30

बोरज फाटा ते देवळे मार्गाची दुरवस्था

ST stuck in roadside soil; | रस्त्यावरील मातीत अडकली एसटी; प्रवाशांची गैरसोय

रस्त्यावरील मातीत अडकली एसटी; प्रवाशांची गैरसोय

Next

पोलादपूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील राहिवाशांना व शालेय विद्यार्थ्यांचे प्रवास फेरीचे साधन असलेल्या एसटी बस सेवा नादुरुस्त रस्ते व मातीच्या गिलावात फसत असल्याने कोलमडत आहेत. शुक्रवारी सकाळी बोरज फाटा ते देवळे या मार्गावर जाणाऱ्या व येणाºया बस मातीत अडकल्या होत्या, त्यातच खड्डे बुजविण्यात येणारी माती पावसाच्या पाण्याने चिखलयुक्त होत असल्याने रस्ते निसरडे बनले आहेत.

तालुक्यातील नागरिक आणि विद्यार्थी एसटी महामंडळाच्या गाड्यांच्या फेऱ्यांवर अवलंबून आहेत. मात्र, ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक बेजार झाले असून, रस्त्याची परिस्थिती पावसाळ्यापूर्वी गांभीर्याने विचारात न घेतल्याने एसटी महामंडळावर दोन गाड्यांच्या फेºया रद्द करण्याची वेळ आली.

मात्र, संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या ताब्यातील रस्त्यांची डागडुजी आणि साइडपट्ट्यांची साफसफाई तातडीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळी पोलादपूर स्थानकातून सुटणाºया लहुलसे व दाभिळ बस सेवा बोरज फाटा ते देवळे मार्गावर मातीमध्ये परतीच्या मार्गावर असताना खचल्या, यामधील प्रवासी उतरल्यानंतर बस बाहेर आली. सकाळी पोलादपूर शहर, ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थी शाळेला तसेच कामधंद्यासाठी येत असतात.

दाभिळ बसमध्ये ४५ च्या आसपास प्रवासी तर लहुलसे गाडीत ४० च्या आसपास प्रवासी होते. सर्व प्रवासी उतरल्यानंतर बस मागे-पुढे करत मातीमधून बाहेर पडली. या मार्गावर उन्हाळात काम करण्यात आले. मात्र, योग्य पद्धतीने काम न केल्याने या मार्गावर पावसाळ्यात खड्डे पडले. येथील खड्डे हे मातीच्या साहाय्याने बुजवले जात असल्यामुळे बस खचत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

पोलादपूर तालुक्यातील आडाची वाडी ते मोरेवाडी, धामणदिवी ते कातळीरोड, चांदके ते खोपड, कुंभळवणे ते सानेवाडी, पितळवाडी ते केवनाळे, गोवेले ते खांडज, बोरघर ते कामथे, साखर ते गोवले आणि देवळे ते करंजे या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे कुंभळवणे ते सानेवाडीपर्यंतच्या गाडीची फेरीही अर्ध्यावर आली आहे. यामुळे नजीकच्या काळात रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांची तातडीने डागडुजी न केल्यास गणेशोत्सवासाठी येणाºया चाकरमान्यांची वाहने खड्ड्यात, मातीत खचून स्वागत होणार आहे.

 

Web Title: ST stuck in roadside soil;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.