महामार्गावर एसटीची ट्रकला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:16 AM2017-08-11T06:16:44+5:302017-08-11T06:16:44+5:30

महाड तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चांढवे बुद्रुक गावाच्या हद्दीत एसटीची धडक लागून ट्रक पलटी झाला. हा अपघात गुरु वारी सकाळी ९.१५ वाजता घडला. यावेळी महामार्गावरून शाळेत जाणारे विद्यार्थी सुदैवाने बचावले.

 ST trucks on highway | महामार्गावर एसटीची ट्रकला धडक

महामार्गावर एसटीची ट्रकला धडक

Next

 बिरवाडी : महाड तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चांढवे बुद्रुक गावाच्या हद्दीत एसटीची धडक लागून ट्रक पलटी झाला. हा अपघात गुरु वारी सकाळी ९.१५ वाजता घडला. यावेळी महामार्गावरून शाळेत जाणारे विद्यार्थी सुदैवाने बचावले.
शिवथर खेड-मुंबई ही बस (एमएच ४० एन ९७२३ ) पोलादपूरकडून महाडकडे येत असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चांढवे बुद्रुक गावाच्या हद्दीत आली, त्या वेळी एसटीची धडक लागून ट्रक (एमएच ४६ बीबी २८९५ ) पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये एसटीच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे तर माल वाहतूक ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. ट्रक चालक महेश पांडुरंग खैरे (४०, रा.पॉटनेरे, इंदापूर,ता. माणगाव) यांनी महाड एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तक्रार नोंदवली आहे.यावेळी रस्त्याच्या बाजूने जाणारे शाळेचे विद्यार्थी मात्र बचावले आहेत. या ठिकाणी साइडपट्टी नसल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिक ग्रामस्थ रफीक पानसरे यांनी सांगितले आहे.
महामार्ग पोलीस सागर गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महादेव म्हस्के, पोलीस कर्मचारी एस. बी. दाभाडे, बिट मार्शल महेश मढवी यांनी मदत करून वाहतूक सुरळीत केली. एसटी बस चालक आर.एम. मुंडे यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालविल्याने एसटी बसमधील ३३ प्रवासी व रस्त्याने जाणाºया शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच महाड आगाराचे वाहतूक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

महावितरणच्या टेम्पोला बिरवाडीत अपघात
बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी आदर्श नगर रस्त्यावर महावितरण कंपनीच्या टेम्पो क्रमांक एम १२ एफडी १९६४ ला अपघात झाल्याची घटना घडली आहे.
महावितरण कंपनीचा टेम्पो घेऊन चालक चंदू कांबळे हा बिरवाडी आदर्श नगर रस्त्याने महावितरण कंपनीचे साहित्य घेऊन जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पोची चाके रस्त्याच्या खाली उतरली.
हा अपघात घडल्यानंतर आदर्श नगर येथील स्थानिक नागरिक राकेश उतेकर यांनी तत्काळ धाव घेऊन सतर्कता दाखवली म्हणून मोठा अनर्थ टळला, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

 

Web Title:  ST trucks on highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.