शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

महामार्गावर एसटीची ट्रकला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 6:16 AM

महाड तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चांढवे बुद्रुक गावाच्या हद्दीत एसटीची धडक लागून ट्रक पलटी झाला. हा अपघात गुरु वारी सकाळी ९.१५ वाजता घडला. यावेळी महामार्गावरून शाळेत जाणारे विद्यार्थी सुदैवाने बचावले.

 बिरवाडी : महाड तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चांढवे बुद्रुक गावाच्या हद्दीत एसटीची धडक लागून ट्रक पलटी झाला. हा अपघात गुरु वारी सकाळी ९.१५ वाजता घडला. यावेळी महामार्गावरून शाळेत जाणारे विद्यार्थी सुदैवाने बचावले.शिवथर खेड-मुंबई ही बस (एमएच ४० एन ९७२३ ) पोलादपूरकडून महाडकडे येत असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चांढवे बुद्रुक गावाच्या हद्दीत आली, त्या वेळी एसटीची धडक लागून ट्रक (एमएच ४६ बीबी २८९५ ) पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये एसटीच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे तर माल वाहतूक ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. ट्रक चालक महेश पांडुरंग खैरे (४०, रा.पॉटनेरे, इंदापूर,ता. माणगाव) यांनी महाड एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तक्रार नोंदवली आहे.यावेळी रस्त्याच्या बाजूने जाणारे शाळेचे विद्यार्थी मात्र बचावले आहेत. या ठिकाणी साइडपट्टी नसल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिक ग्रामस्थ रफीक पानसरे यांनी सांगितले आहे.महामार्ग पोलीस सागर गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महादेव म्हस्के, पोलीस कर्मचारी एस. बी. दाभाडे, बिट मार्शल महेश मढवी यांनी मदत करून वाहतूक सुरळीत केली. एसटी बस चालक आर.एम. मुंडे यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालविल्याने एसटी बसमधील ३३ प्रवासी व रस्त्याने जाणाºया शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच महाड आगाराचे वाहतूक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.महावितरणच्या टेम्पोला बिरवाडीत अपघातबिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी आदर्श नगर रस्त्यावर महावितरण कंपनीच्या टेम्पो क्रमांक एम १२ एफडी १९६४ ला अपघात झाल्याची घटना घडली आहे.महावितरण कंपनीचा टेम्पो घेऊन चालक चंदू कांबळे हा बिरवाडी आदर्श नगर रस्त्याने महावितरण कंपनीचे साहित्य घेऊन जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पोची चाके रस्त्याच्या खाली उतरली.हा अपघात घडल्यानंतर आदर्श नगर येथील स्थानिक नागरिक राकेश उतेकर यांनी तत्काळ धाव घेऊन सतर्कता दाखवली म्हणून मोठा अनर्थ टळला, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.