रुंदीकरणातील जमीन संपादनावरून संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:15 PM2018-11-29T23:15:49+5:302018-11-29T23:16:01+5:30
कर्जत-मुरबाड-शहापूर रस्ता : शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
नेरळ : कर्जत-मुरबाड-शहापूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम एमएमआरडीकडून हाती घेण्यात आले आहे. मात्र, या कामाबाबत शेतकºयांमध्ये संभ्रम आहे. कळंब, चाहूची वाडी, वारे, पोही, खैरपाडा, सुगवे, कशेळे, येथील बाधित शेतकºयांच्या वतीने एकत्र येऊन संघर्ष समिती स्थापन केली आहे. यासाठी वारे येथील हनुमान मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
शेतकºयांत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी कर्जत-खालापूरचे आमदार सुरेश लाड यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाºयांसह कळंब येथील हनुमान मंदिरात काही दिवसांपूर्वी सभा घेण्यात आली होती. सभेत शेतकºयांना मार्गदर्शन करताना एमएमआरडीच्या अधिकाºयांनी कर्जत-मुरबाड-शहापूर रस्ता हा दहा मीटर काँक्र ीटीकरण होत असून, दोन्ही बाजूस दोन मीटरच्या साइडपट्टीचे काम होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आहे त्या रस्त्याचेच जर काँक्र ीटीकरण होणार असेल तर शेतकरीही विरोध करणार नाहीत, असे शेतकºयांनी सांगितले; परंतु रुंदीकरणाच्या कामासाठी सर्व्हे करताना दोन्ही बाजूंनी १५ ते २० मीटरपर्यंतच्या झाडांची मार्किंग केल्याने त्यात अनेक शेतकºयांच्या शेतजमिनी बाधित होणार आहेत. या रस्त्याचे इतर ठिकाणी जिथे काम सुरू आहे त्या खोपोली-पाली मार्गावरील परळी, पेडली, जांभूळपाडा या ठिकाणची पाहणी केली असता, तिथे मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी १५ ते १८ मीटरपर्यंत मातीच्या भरावाचे काम केल्याचे निदर्शनात आल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. एकूण ९१ कि.मी.च्या होणाºया रस्त्याची अधिकारीवर्गाकडून दिलेली माहिती व प्रत्यक्ष काही ठिकाणी सुरू असलेल्या कामात विरोधाभास दिसत आहे.
रस्ता नक्की किती रुं द असणार? सर्व रु ंदी एकाच मापात होणार की कमी-जास्त? याबाबत शेतकºयांच्या मनात शंका आहे. अधिकाºयांकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
नाशिक मार्गे समृद्धी महामार्गाला जोडणाºया, शहापूर ते मुरबाड हद्दीपासून, कर्जत तालुक्यातील चाहूची वाडी ते हाळफाटापर्यंत आणि पुढे खालापूर तालुक्यातून मुरुडपर्यंत होणाºया महामार्गाचे काम सुरू आहे. त्याला अनेक ठिकाणी शेतकºयांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात एमएसआरडीसीच्या अधिकाºयांनी शेतकºयांना विश्वासात घेणे अपेक्षित असल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यापूर्वीही रस्ता रुं दीकरण करताना कोणत्याही शेतकºयाला आजतागायत संपादित जमिनीचा मोबदला देण्यात आलेला नाही, त्यामुळे शेतकºयांमध्ये असंतोष असून आंदोलनाच्या तयारीत आहेत. या संदर्भात संबंधित विभागास संघर्ष समितीकडून निवेदने दिली असून, आमच्या संपादित शेतजमिनीला योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे.
अधिकाºयांनी दिलेली माहिती, प्रत्यक्ष कामात तफावत
कार्यकारी अभियंता यांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने एमएसआरडीसीकडे वर्ग केला आहे. आता तो नॅशनल हायवे क्र मांक ५४८/अ झाला आहे. यापुढे ठाणे-नाशिक, मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा या तीन महामार्गाला जोडत आहे.
रस्त्याच्या कामाच्या निविदा जूनमधे निघाल्या असून, हा रस्ता एकूण ९१ किलोमीटरचा होणार आहे, रस्त्याची रु ंदी ११ मीटर असणार आहे आणि दोन्ही बाजूच्या साइडपट्टी दोन-दोन मीटर असणार आहेत.
ज्या ठिकाणी डोंगर असेल, तिथे कच्ची गटारे बनवण्यात येणार असून, ज्या गावांमधून रस्ता जात आहे तिथे पक्की गटारे होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. रुंदीकरणामुळे शक्यतो कोणतेही दुकान, घरे तुटू नयेत, याची दक्षता घेत असल्याचे या वेळी अधिकाºयांनी स्पष्ट केले.