अलिबाग : रायगडमध्ये उन्हाळ््यामुळे लाहीलाही होत असतानाच आता लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे. उमेदवारांच्या गावागावांतील बैठका-सभांनंतर विविध राजकीय पक्षाचे स्टार प्रचारक आता रायगड लोकसभा मतदारसंघात प्रचार सभांकरिता येणार आहेत.
रायगड लोकसभा मतदारसंघात १६ उमेदवार नशीब आजमावित असून २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, प्रमुख लढत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते व काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस-शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार राष्टÑवादीचे सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यात आहे.उद्धव ठाकरे १७ रोजी माणगावातयुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंसह रायगडचे पालकमंत्री मैदानात उतरणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमख उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी माणगावमध्ये १७ एप्रिल रोजी सभा घेणार आहेत. या सभेत उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना-भाजपचे मंत्री सभेत उपस्थित राहणार आहेत. यासह शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री रामदास कदम अनंत गीतेंच्या प्रचारासाठी लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत.
१८ एप्रिलला शरद पवार अलिबागमध्येराष्टÑवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार अलिबाग समुद्रकिनारी असणाऱ्या जे.एस.एम. कॉलेज क्रीडांगणावर गुरुवार १८ एप्रिल रोजी जाहीर सभा घेणार असून या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत.
१९ एप्रिलला राज ठाकरे रायगडमध्येमहाराष्टÑ नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधी भूमिका घेत, भाजप-शिवसेना युतीविरोधात रान उठविले आहे. युतीविरोधात आपण राज्यात ठिकठिकाणी सभा घेणार असल्याचेही त्यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. त्यानुसार राज ठाकरे१९ एप्रिल रोजी दक्षिण रायगडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.