शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

भात लावणीची लगबग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 3:13 AM

चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगला जोर धरला असून शेतातील नागरणीअंती चिखलणी पूर्ण होवून भात लावण्या रंगात येवू लागल्या आहेत.

अलिबाग : चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगला जोर धरला असून शेतातील नागरणीअंती चिखलणी पूर्ण होवून भात लावण्या रंगात येवू लागल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात भात पिकाखालील क्षेत्र १ लाख ५ हजार हेक्टर होणे कृषी विभागास अपेक्षित आहे.भात शेतीच्या मशागतीचे उलकटणी, राब पेरणी असे महत्त्वाचे टप्पे आटोपल्यानंतर आता सध्या सर्वत्र चिखलणी सुरू झाली आहे. या दरम्यान पिकाला नत्राचा पुरवठा द्यावा लागतो, त्यादृष्टीने खतांचे डोस दिले जातात. त्यासाठी खताचीही मुबलक उपलब्धता करून देण्यात आली आहे. लावणीनंतरही चाळीस दिवसात दोनदा नत्राची मात्रा दिली जाते. यासंदर्भात शासनाचा कृषी विभाग शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देत आहे.शेतकºयांना बियाण्यांची उपलब्धता यापूर्वीच करून देण्यात आली आहे. राबांची उगवण चांगली झाल्याने भात रोपे देखील लावणी योग्य झाली आहेत. खताचा व कीटकनाशकांचा साठा शेतकºयांच्या मागणीनुसार उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी दिली आहे. भाताच्या काही जाती या ४८ दिवसांत, काही ५२ तर काही ६२ दिवसांत तयार होतात. त्यादृष्टीने शेतकरी आपल्या शेती कामांचे नियोजन करीत असतात.भाताबरोबर नागली आणि तुरीची लागवडजिल्ह्याच्या खरीप हंगामासाठी एकूण १ लाख १४ हजार ४४३ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र हे भात पिकाखाली राहणार असून भात पेरणी १ लाख ५ हजार २६२ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.त्या खालोखाल ७ हजार १२८ हेक्टरवर नागली, ९७५ हेक्टरवर इतर तृणधान्य, ९०६ हेक्टरवर तूर तर १७३ हेक्टरवर इतर कडधान्य लागवड नियोजित आहे.खते-बियाण्यांची उपलब्धताखरीप हंगामासाठी जिल्ह्यात १५ हजार १५५ क्विंटल भात बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली होती तर २४ हजार ६०० मेट्रिक टन इतक्या रासायनिक खताची उपलब्धता शेतकºयांच्या मागणीनुसार करण्यात आली आहे. तसेच ३४ हजार ९०० लिटर्स कीटकनाशके व बुरशी नाशकांची उपलब्धता करण्यात आली आहे.