मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यातील एकदरा खाडीतील गाळ काढण्याच्या कामास सुरु वात करण्यात आली आहे. गाळात बोटी रुतत असल्याने मच्छीमारांकडून गेल्या काही वर्षांपासून खाडीतील गाळ काढण्याची मागणी करण्यात येत होती. आता या कामास सुरुवात झाल्याने कोळी बांधवांकडून समाधान व्यक्त होत आहे.मत्स्यविभागामार्फत या कामाची सुरु वात करण्यात आली आहे. एकदरा खाडीतील गाळ काढून खाडी रुं द व खोलगट करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोळी बांधवांच्या होड्या किनाºयावर सहज येतील. मे महिन्याच्या अखेरीला होड्या किनाºयावर आणण्यासाठी कोळी बांधवांना खूप कष्ट घ्यावे लागतात. आता या ठिकाणी स्लोपिंग यार्डही बनवण्यात येणार आहे. त्यामुळे कोळी बांधवांसाठी हे काम वरदायी ठरणार आहे. एकदरा खाडीवर शेकडोंच्या संख्येने होड्या शाकारल्या जातात. या वेळी होड्या उभ्या करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती; परंतु आता येथील स्लोपिंग यार्डचे काम झाल्यास याचा चांगला फायदा होड्या शाकारण्यासाठी होणार आहे.रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, तवसाळकर पासून ते दीपस्तभापर्यंत ग्रोएन्स बंधारा व्हावा, अशीआमची मागणी होती. सदरचाबंधारा झाला असता तर खाडी आपोआप खोलगट झाली असती; परंतु आता सुरू झालेल्या कामावर कोळी बांधव समाधानी आहेत. एकदरा पुलापासून ते कब्रस्थान येथील गाळ काढून रॅमचे काम होणे आवश्यक असल्याचे मत या वेळी त्यांनी व्यक्त केले.गाळाच्या कामाचा ठेका हा डी. बी. पवार यांना देण्यात आला आहे. या पैशांतून एकदरा येथे २५ बाय १० मीटरची जेट्टी बांधण्यात येणार आहे. एकदरा खाडीतील गाळ काढण्यात येणार आहे. येथे ९० मीटरची जिओ ट्यूब बसवण्यात येणार आहे. २३४ बाय ४५ मीटर मासळी सुकवण्याच्या ओट्यासह बोट यार्ड बनवण्यात येणार, २० बाय ८ मीटरचे उतरते चार रॅम, चाळीस बाय १० मीटर जाळी विणण्यासाठी शेड बांधण्यात येणार आहे. तसेच टॉयलेट व्यवस्था,२५ सौर ऊर्जेचे दिवे बसवण्यात येणार आहेत. बोरवेलचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. एकदरा खाडीतील या सोयी-सुविधांमुळे पर्यटन व्यवसायालाही चालना मिळेल, अशी आशा स्थानिक व्यावसायिकांना आहे.
एकदरा खाडीतील गाळ काढण्यास सुरुवात, स्लोपिंग यार्डमुळे होड्या शाकारण्यास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 3:08 AM