शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

रायगड संवर्धनाच्या कामाला येत्या २० दिवसांत प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 3:10 AM

रायगड प्रधिकरणाच्या माध्यमातून ६०६ कोटी रुपये खर्च करून रायगड संवर्धन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. येत्या २० दिवसांमध्येच या कामाला प्रत्यक्षात प्रारंभही करण्यात येणार आहे. या कामादरम्यान शासकीय अधिकाºयांकडून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाल्यास तो प्रकार सहन करणार नाही.

महाड : रायगड प्रधिकरणाच्या माध्यमातून ६०६ कोटी रुपये खर्च करून रायगड संवर्धन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. येत्या २० दिवसांमध्येच या कामाला प्रत्यक्षात प्रारंभही करण्यात येणार आहे. या कामादरम्यान शासकीय अधिकाºयांकडून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाल्यास तो प्रकार सहन करणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच रायगड प्रधिकरणाचे अध्यक्ष खा. युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी महाड येथे दिला.मंगळवारी खा. संभाजीराजे यांनी किल्ले रायगडला भेट दिली. त्यानंतर त्यांनी महाड शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. रायगड संवर्धन प्रकल्पासाठी राज्य शासनाने ६०६ कोटी रु पयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ११२ कोटी रुपये किल्ले रायगडावरील विविध अवशेषांचे संवर्धन करण्यासाठी वापरण्यात येणार असून, उर्वरित निधीतून रायगड परिसरातील २१ गावांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संवर्धन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात किल्ले रायगडावर किमान साडेतीनशे ठिकाणी उत्खनन, नैसर्गिक स्वरूपातील पथवे आणि रायगड रोपवे (गड), कुशावर्त तलाव ते होळीचा माळ रस्ता, ही तीन कामे प्रथम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पाचाड येथे राजमाता जिजाऊ राजवाडा परिसरात ८८ एकर जागा संपादित करण्यात येणार असून, तेथे पीपीपी तत्त्वावर संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी शिवकालीन सरदारांची माहिती, त्यांच्या वंशजांकडून मिळालेल्या ऐतिहासिक वस्तूंचेही जतन करण्यात येणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली आहे. त्यांनी राज्यातील गडकोटांची जी छायाचित्रे काढली आहेत, ती छायाचित्रे या संग्रहालयात ठेवण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केल्याचेही खा. संभाजीराजे यांनी सांगितले.यापूर्वी किल्ले रायगडावरील उत्खननात सापडलेल्या आणि सध्या पुरातत्त्व विभागाच्या औरंगाबाद येथील संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या शिवकालीन वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात येतील. त्याचप्रमाणे नव्याने करण्यात येणाºया उत्खननात सापडलेल्या शिवकालीन वस्तूदेखील या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. ज्या लोकांकडे शिवकालीन वस्तू असतील, त्यांनीही त्या या संग्रहालयात ठेवण्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन खा. संभाजीराजे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार किंवा खासदार म्हणून नव्हे, तर एक शिवभक्त म्हणून रायगड प्रधिकरणाच्या अध्यक्षपदाचे आव्हान स्वीकारलेले आहे. मला रायगडमधून कोणतीही निवडणूक लढवायची नाही, रायगड संवर्धनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण करून आपण परत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.१प्रत्यक्ष किल्ल्यावरील कामात, रायगडचे नैसर्गिक स्वरूप जपण्यावर भर देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी जाणे अवघड आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी नैसर्गिक टच असलेला रस्ता आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्या तरी तेथील दुर्गम भाग कायम ठेवण्यात येणार आहे. केवळ साहसी व्यक्तीच तेथे जाऊ शकतील, असा या मागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.२रायगड संवर्धन प्रकल्पासाठी राज्य शासनाने ६०६ कोटी रु पयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी एकदाच उपलब्ध होणार आहे. त्यानंतर दुरु स्ती आणि देखभालीच्या कामासाठी शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे प्रधिकरणाच्या माध्यमातून दुरु स्ती आणि देखभालीच्या कामासाठी स्वतंत्र निधी उभा करणे गरजेचे आहे. त्यासाठी काय करता येईल? यावर विचार सुरू असल्याचे ते म्हणाले.३महाड (नातेखिंड) ते रायगड या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात येणार आहे. मात्र, हा महामार्ग इतर महामार्गांसारखा साचेबंद नसावा, त्याला इतिहासकालीन स्वरूप दिले जावे, अशी भूमिका खा. संभाजीराजे यांनी या वेळी मांडली. या संदर्भात लवकरच आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.- रायगड प्रधिकरणाच्या माध्यमातून रायगड संवर्धनाचे जे काम करण्यात येणार आहे, ते पारदर्शक असेल. याची ग्वाही खा. संभाजीराजे यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम करून घेतले जाणार आहे. मात्र, महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार पारदर्शक नाही, हा विभाग भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे.या विभागातील अधिकारी भ्रष्ट आहेत, ही बाब पत्रकारांनी खा. संभाजीराजे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर भाष्य करताना, प्रधिकरणाचा अध्यक्ष म्हणून प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष राहणार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कामामध्ये काहीही चुकीचे होत असल्यास ती बाब लक्षात आली तर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Raigadरायगड