शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ

By admin | Published: June 06, 2017 12:16 AM

रायगडावर शिवभक्तांची मांदियाळी : शिवछत्रपतींच्या मूर्तीवर आज सुवर्णनाण्यांचा अभिषेक

प्रवीण देसाई ।  लोकमत न्यूज नेटवर्क --रायगड : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर आज, मंगळवारी दिमाखात साजरा होत आहे. सोमवारी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गड पुजनाने या सोहळ्याला प्रारंभ झाला. मंगळवारी सकाळी १० वाजता राज सदरेवर मुख्य सोहळा होणार आहे.सोमवारी सायंकाळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे गडावर पुष्पवृष्टींनी स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांंनी शिरकाई देवीचे दर्शन त्यांनी घेतले. यानंतर ढोल ताशाच्या गजरात होळीच्या माळावर जल्लोषी स्वागत झाले. येथे मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके झाली. त्यानंतर नगारखान्याच्या प्रवेशद्वारावर समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत व कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांच्या हस्ते व शिवकालीन शस्त्रास्त्रांचे संग्राहक गिरीष जाधव, स्थानिक प्रतिनिधी रघुवीर देशमुख, पंचक्रोशीतील गावकरी यांच्यासह समिती व महाराष्ट्र शाहिर परिषदेचे सदस्य आणि इतिहासप्रेमींच्या हस्ते गडपूजन, अश्वपूजन, शस्त्रास्त्रपूजन आदी कार्यक्रम झाले. यावेळी शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय...जय भवानी...जय शिवाजी... संभाजीराजे छत्रपती यांचा विजय असो... अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. भगवे ध्वज, भगव्या टोप्या व भगवे टी शर्ट परिधान केलेल्या शिवभक्तांमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. चटके देणारे ऊन, मुसळधार पाऊस अन धुके अशा वातावरणात सोहळ्याचा उत्साह द्विगुणीत झाला. संभाजीराजेंनी तासाभरात केला रायगड सरप्रतिवर्षीप्रमाणे रोप-वे ने न जाता संभाजीराजे छत्रपती यांनी पायी रायगड सर केला. दुपारी ४ वाजता, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चित्त दरवाजाने रायगडावर चढाईस सुरुवात केली. महाद्वार येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या हस्ते महाद्वारावर तोरण चढविण्यात आले. यावेळी शहाजीराजे छत्रपती यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.गौरव शिवभक्तांचाशिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमीत्ताने रायगडावर विविध कार्यक्रमांर्गत आज दुर्ग स्वच्छता अभियानात उत्सफूर्तपणे सहभागी शिवभक्त-इतिहासप्रेमी संस्था-संघटना आणि व्यक्तींचा विशेष गौरव संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाला. यावेळी शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक गिरीष जाधव आणि आदर्श हिवरेबाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर राज्यभरातून आलेल्या शिवशाहिरांनी आपल्या पोवाडा गायनाने उपस्थितांची मने जिंंकली. यानंतर गडावरील स्थानिक महिलांना युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्यावतीने पाठविण्यात आलेल्या साडी-खणाने सन्मानित करण्यात आले. सत्काराच्या सोहळ्यानंतर शिवशाहिर शहाजी माळी, दिलीप सावंत, आझाद नायकवडी (सर्व कोल्हापूर), सुरेश जाधव (औरंगाबाद), राजेंद्र कांबळे (अकलूज) यांनी ‘ही रात्र शाहिरांची...’ हा कार्यक्रम सादर करून उपस्थितांसमोर शिवशाहिचा इतिहास उभारला.ओंकार व्यवहारे या बाल शाहिरानेही सादरीकरण करून मने जिंकली. इतिहासप्रेमी संघटनांकडून प्रबोधन...शिवराज्याभिषेकासाठी रायगडावर जमलेल्या शिवभक्त व इतिहाप्रेमींकडून प्रबोधनाची मोहिमही राबविण्यात आली. वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन तर्फे शिवभक्तांना १ लाख पाण्याचे पाऊच मोफत वाटण्यात आले. नाशिक जिल्हा शिवकार्य गडकोट मोहिमेतर्फे ‘किल्ले वाचवा’साठी जागृती करण्यात आली. कोल्हापूर हायकर्सतर्फे हिमालय पर्वत आणि सह्याद्री रांगेतील गडकोटांवरू अभिषेकासाठी जल आणण्यात आले होते.आज मुख्य सोहळा...शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा मंगळवारी दि. ६ रोजी, सकाळी १० वाजता होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ६ वाजता, नगारखान्यासमोरील ध्वजस्तंभावर इचलकरंजी येथील शिवभक्तांकडून भव्य भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे. अभिषेकाच्या मुख्य सोहळ्यानंतर पारंपारिक जवाजम्यासह शिवछत्रपती, जिजाऊ यांच्या पालखी मिरवणूका निघतील. यानंतर जगदिश्वर मंदीर दर्शन आणि शिवसमाधी पूजनाने पालखी सोहळ्याची सांगता होईल. अन्नछत्राचे सोहळ्याची सांगता होणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर मंगळवारी दिमाखात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे सोमवारी रायगडावर आगमन झाले. यावेळी त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकावेळी ढोल वाजविला. दुसऱ्या छायाचित्रात मर्दानी खेळ सादर करून उपस्थितांकडून वाहव्वा मिळविली.