- लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सरकार आणि प्रशासनाकडे सातत्याने खेटे मारूनही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नसल्याने काहीजण हतबल होतात. मात्र शिरवली गावातील तरुणांनी क्रिकेट स्पर्धेत जिंकलेल्या रकमेतून गावासाठी बंद पडलेली पाणीपुरवठा योजना सुरु केली. अलिबाग तालुक्यातील शिरवली गावातील नवीन वसाहतीमध्ये गेल्याच वर्षी पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली होती. स्थानिक प्रशासनाने त्या योजनेकडे दुर्लक्ष केल्याने पाणीपुरवठा बंद पडली होती. योजनेला पुन्हा मूर्त रु प द्यावे यासाठी ग्रामस्थांनी सरकार प्रशासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता, परंतु ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. अखेरीस शिरवली नवीन वसाहतीतील तरु णांनी पुढाकार घेत क्रिकेट सामन्यांच्या खेळातून मिळविलेल्या पुरस्काराच्या रकमेतून शिरवली नवीन वसाहतीस पाणीपुरवठा सुरु केला. नळयोजनेच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केल्याने ही योजना पूर्णपणे ठप्प पडली होती. त्यामुळे शिरवली नवीन वसाहतीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. याचा महिलांसह मुलांना त्रास होत होता.शिरवली ग्रामपंचायतीकडे वारंवार अर्ज व विनंत्या करूनदेखील ही नळयोजना दुरुस्त न करता मंजूर कामांमध्ये अडथळा आणण्याचे काम होत असल्याने ग्रामस्थ मेटाकुटीला आले होते. अखेर सातविरादेवी क्रि केट संघाने हाशिवरे येथे आयोजित क्रि केट सामन्यांमध्ये जिंकलेल्या पुरस्काराच्या रकमेतून नळ पाणीपुरवठा योजना दु रुस्त केली. यासाठी तरु णांनी श्रमदान देखील केले. पाणीटंचाईच्या काळात तरु णांनी केलेल्या या स्तुत्य कार्याचे कौतुक ग्रामस्थ करत आहेत, तसेच महिलांकडून आनंद व्यक्त होत आहे.
बक्षिसाच्या रकमेतून पाणी योजना सुरू
By admin | Published: May 19, 2017 3:53 AM