आजपासून दहावीची परीक्षा सुरू
By admin | Published: March 7, 2017 02:43 AM2017-03-07T02:43:21+5:302017-03-07T02:43:21+5:30
दहावीची परीक्षा मंगळवार ७ मार्चपासून सुरू होत आहे
अलिबाग : दहावीची परीक्षा मंगळवार ७ मार्चपासून सुरू होत आहे. रायगड जिल्ह्यातील ६८ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. ४१ हजार ७३ परीक्षार्थी ही परीक्षा देण्यासाठी पात्र ठरले आहेत. कॉपीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सहा भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
७ मार्च ते १ एप्रिल २०१७ या कालावधीमध्ये दहावीची परीक्षा पार पडणार आहे. अलिबाग को.ए.सो. अरुणकुमार वैद्य हायस्कूल, जे.एस.एम. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्था पाहण्यासाठी गर्दी केली होती. रायगड जिल्ह्यामध्ये दहावीच्या परीक्षेसाठी ४१ हजार ७३ विद्यार्थी बसले आहेत.
कॉपीसारखे प्रकार रोखण्यासाठी सहा भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये महिला भरारी पथकाचा प्रामुख्याने समावेश केला आहे. सहा भरारी पथक संपूर्ण जिल्ह्यातील ६८ परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देणार आहेत. पोलिसांकडूनही परीक्षा केंद्रावर बंदोबस्त असणार आहे. (प्रतिनिधी)
>कॉपी रोखण्यासाठी पथक
कॉपी रोखण्यासाठी सहा भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून पथकामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, निरंतर विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्यासह अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.