शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

कशेळे येथे जीओडी बसवण्याच्या कामास सुरुवात

By admin | Published: July 10, 2016 12:32 AM

तालुक्याचा वीजपुरवठा अनेक वेळा गायब होत आहे. तालुक्यातील कशेळे येथे गेल्या एक महिन्यापासून तर दिवस दिवसभर वीज गायब असते. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी

कर्जत : तालुक्याचा वीजपुरवठा अनेक वेळा गायब होत आहे. तालुक्यातील कशेळे येथे गेल्या एक महिन्यापासून तर दिवस दिवसभर वीज गायब असते. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत सदर जीओडी (गँग आॅपरेटेड स्विच डीसी व्हॉल्ट) बसविले नाही, तर वीज वितरण कार्यालयावर कशेळे ग्रामस्थांचा मोर्चा आणू, असा इशारा उदय पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे इशाऱ्याची दखल घेत कशेळे लाइनवर जीओडी बसविण्याचे काम सुरू झाले आहे. कशेळे ग्रामपंचायतीने वीज वितरण कंपनीला पॉवर हाऊसकरिता गावातील मोक्याच्या ठिकाणी जागा दिली आहे. या ठिकाणावरून अनेक गावांना विद्युत पुरवठा करणारी लाइन गेली आहे. त्याचे वीजखांब कशेळे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीतून टाकले आहेत. हे खांब टाकताना वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांनाविश्वासात घेतले नाही. शेताच्या मध्यभागी वीजखांब टाकण्यात येत असल्याने शेतीची कामे करताना अडचणी येतात. त्यामुळे हे खांब शेतीच्या बांधावर टाकावे, तसेच शेतात टाकलेले खांब अन्यत्र हलवावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतातील वीज खांब हटविण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जात असल्याचे उदय पाटील यांनी सांगितले. तसेच पॉवर हाऊसला जागा देत असताना कशेळे गावातील वीज मिळेल, असे आश्वासन तत्कालीन अधिकाऱ्यांनी दिले होते. स्वतंत्र जीओडीमुळे वीजपुरवठा सुरळीत- कशेळे लाइनवर वैजनाथ, हुमगावपर्यंतच्या ५० गावांचा परिसर जोडला आहे. मधल्या पट्ट्यात अनेक वेळा झाड पडल्याने किंवा इतर कारणाने तारा तुटतात आणि कशेळे परिसरात अंधार पसरतो. - कशेळे आणि वंजारवाडी येथे एक जीओडी बसविण्याची मागणी कशेळे ग्रामस्थ गेली अनेक वर्षे करीत आहेत; काही फॉल्ट झाला तर सर्वच गावे अंधारात न राहता काही भागात विद्युत पुरवठा सुरळीत राहील,- वीज वितरण कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शनिवारी जीओडी बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.