भात पिकाच्या नुकसानाचे पंचनामे सुरू; वाशी-खारेपाट शिवारातील भातशेती बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 05:31 AM2018-10-07T05:31:44+5:302018-10-07T05:31:54+5:30
पेण, वाशी-खारेपाटाला बसलेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
पेण : पेण, वाशी-खारेपाटाला बसलेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. वादळी वाऱ्याने कणसे भरलेली पिके जमीनदोस्त केल्याने शेतीमध्ये तयार झालेली भाताची कणसे तळाशी पाण्यात पडल्याने त्या कणसांना पाण्यामुळे अंकुर फुटून हातातोंडाशी आलेल्या धान्याची मोठी हानी झाली आहे.
या बाबतीत तहसीलदार पेण यांच्याकडे ‘लोकमत’ने पाठपुरावा केला होता. त्या वेळी जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार शेतीचे पंचनामे करण्याचे आश्वासन माध्यमांना मिळाले होते.
गुरुवारी पेणचे आ. धैर्यशील पाटील व राजिप कृषी सभापती प्रमोद पाटील यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शेतीचे वादळी पावसात झालेले नुकसानीचे इतिवृत्तान्त जिल्हाधिकाºयांसमोर मांडण्यात आले होते. त्यानुसार आजपासून शेतीच्या नुकसानीमध्ये पंचनामे करण्यात पेण तालुक्यात प्रारंभ झाला आहे.
तालुका कृषी अधिकारी ए. आर. रोकडे यांच्याशी थेट संपर्क साधून या संयुक्त पाहणी दौºयाप्रसंगी शेतकरी बांधवांनी आपापल्या ग्रा. पं. ग्रामसेवकांशी संपर्क करून कृषी सहायक व तलाठी वर्गाला सहकार्य करून बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यास सहकार्य करावे. संबंधित शासनाचे तीनही कर्मचारी केलेल्या संयुक्त पंचनाम्याचा अहवाल तालुका कृषी अधिकाºयांकडे सादर करून बाधित शेतीच्या एकूण आर्थिक नुकसानीचा तपशील कळेल. शेती शिवाय पडलेली फळफळांचे राजीनामे आज समाविष्ट आहेत. तरी या आपत्ती विषयक संयुक्त शेतीविषयक पंचनामे करू झाल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला असून, पेणचे आ. धैर्यशील पाटील यांनी याबाबतीत जिल्हाधिकारी रायगड डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष भेटीने शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करण्यास वेळीच प्रारंभ झाल्याने शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे.