पनवेल : खारघर शहरातील प्रस्तावित तेरा मीटरचा सर्व्हिस कॉरिडोर गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस केला होता. यासंदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रस्तावित जागेवरील सामान उचलण्यास दुकानदारांनी सुरुवात केली आहे.
सुमारे दोन किमीच्या सर्व्हिस कॉरिडोरच्या जागेवर येथील दुकानदारांनी अनेक वर्षांपासून कब्जा केला आहे. या जागेवर दुकानाचे जनरेटर, कार विक्री, अनधिकृत पार्किंग मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. लोकमतच्या बातमीनंतर हा रस्ता मोकळा करण्यात आला. येथील दुकानासमोरील जनरेटर गुरुवारी हटविण्यात आले . दुकानदारांनी स्वत: जनरेटर हटविले आहे. सिडकोच्या कारवाईच्या भीतीपोटी हे जनरेटर हटविण्यात आले आहे. मात्र अद्याप याठिकाणी अनिधकृत वाहनांची पार्किंग सुरु आहे. मध्यंतरी खारघर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांनी देखील सिडकोला या सर्व्हिस कॉरिडोरसंदर्भात पत्र लिहिले होते.