पेण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रुं दीकरणाच्या कामात वाशी नाका, बोरीफाटा, डोलवी या तीन ठिकाणी मार्गिकांचा ठावठिकाणा महामार्ग संकल्प चित्र आराखड्यात समाविष्ट केलेला नव्हता. विषय लोकजीवनाच्या दैनंदिन दळणवळणाशी संबंधित असल्याने यासाठी शेकाप पेण तालुका संघटना आणि वाशी, डोलवी, मसद, शिर्की, बोरी या खारेपाटातील ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामस्थांनी काम बंद आंदोलन के ले. पहिल्याच दिवशी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अभिषेक अग्रवाल यांनी इतिवृत्तान्त मंत्री व वरिष्ठ अधिकारीवर्गाला दिल्याने सोमवारी सायंकाळीच सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आ. धैर्यशील पाटील यांना पत्र पाठवून २२ जानेवारीला मंत्रालयातून बैठकीचे निमंत्रण दिले आहे.
या बैठकीमध्ये उपाययोजनेवर शिक्कामोर्तब होणार असून, हा आंदोलनकर्त्यांचा विजय आहे. त्याचबरोबर वाशी खारेपाटातील ५५ हजार लोकवस्तीचा दळणवळण मार्गिकेचा प्रश्न निकाली निघेल, असे शासनाने घेतलेल्या भूमिकेवरून दिसत आहे. वाशी विभागातील दिव ग्रामपंचायत सरपंच विवेक पाटील यांच्या दिव, नाखेल, बेनवले येथील ग्रामस्थांनी मंगळवारी दुसऱ्या दिवशी ठिय्या आंदोलन केले. आ. धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्यांमध्ये अनुक्रमे प्रभाकर म्हात्रे, नीलिमा पाटील, प्रमोद पाटील, डी. बी. पाटील, पेण पंचायत समिती सभापती स्मिता दिवेकर, दिव ग्रामपंचायतीमधील प्रफुल्ल म्हात्रे, एकनाथ ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, आत्माराम मोकल, आंदोलनाचे संयोजक संदेश ठाकूर आदी मंडळी पुन्हा सहभागी झाली होती. मंगळवारी आंदोलनस्थळी वाशी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला. बोर्झे माजी सरपंच विजय ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते राजन झेमसे, आगरी गीतकार अशोक मढवी या सर्व मंडळींनी मोठ्या संख्येने समर्थकांसहित वाशीनाका येथे मार्गिका मिळावी, यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.काम बंदच राहणारच्ठेकेदार कंपनीला मंत्रालयातील बैठक संपन्न होईपर्यंत वाशी नाका, बोरीफाटा व डोलवी येथील काम बंद राहणार आहे.च्मंत्रालयात होणाºया बैठकीत उपाययोजनेवर शिक्कामोर्तब होणार आहे, यामुळे आंदोलनाला यश आल्याचे मानले जात आहे.