खड्ड्यांमुळे कर्जतमध्ये न जाताच राज्यमंत्री माघारी, दौरा अर्धवट राहिल्याने कर्जतकर निराश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 06:56 AM2017-09-13T06:56:00+5:302017-09-13T06:56:00+5:30
भाजपाचे कार्यकर्ते सुनील गोगटे यांच्या मागणीनंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री प्रवीण पोटे कर्जत येथे रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले. दौºयाला सुरु वात करताच, जेमतेम चार किलोमीटर आपल्या सरकारी गाडीने प्रवास करणारे मंत्री महोदय रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांनी त्रस्त झाले आणि कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची घोषणा करीत, कर्जतमध्ये न येताच माघारी परतले.
कर्जत : भाजपाचे कार्यकर्ते सुनील गोगटे यांच्या मागणीनंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री प्रवीण पोटे कर्जत येथे रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले. दौºयाला सुरु वात करताच, जेमतेम चार किलोमीटर आपल्या सरकारी गाडीने प्रवास करणारे मंत्री महोदय रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांनी त्रस्त झाले आणि कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची घोषणा करीत, कर्जतमध्ये न येताच माघारी परतले. बांधकामखात्याच्या राज्यमंत्र्यांचा हा दौरा कर्जत तालुक्यासाठी फलदायी ठरला नसल्याने कर्जतकरांनी नाराजी व्यक्त के ली.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी जाहीर केल्याप्रमाणे, तब्बल दोन तास उशिरा कर्जत चौक रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी चौक येथून कर्जतकडे निघाले. त्यांनी जुन्या मुंबई-पुणे रस्त्याने राज्यमार्ग दर्जाच्या चौक-कर्जत भागात आपल्या सरकारी वाहनाने पाहणी दौरा सुरू केला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कमी-जास्त उंचीची टेमकुळे निर्माण झालेल्या रस्त्याने जाताना एनडी स्टुडिओ येथे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्याशी चर्चा करण्यासाठी गाडीतून खाली उतरलेले मंत्री पोटे यांनी वावर्ले आणि बोरगाव येथील खड्डे बघून कर्जत तालुक्यात प्रवेश न करता, आपल्या गाड्यांचा ताफा वळवून पुन्हा चौक गाठले.
कर्जतकडे जाणाºया रस्त्याची पाहणी करण्यासाठी मंत्री महोदय निघाले खरे; पण होडीच्या प्रवासाचा अनुभव आल्याने मंत्री महोदयांनी वावर्ले-बोरगाव येथूनच दौरा आवरता घेतला. त्यांच्या या कृतीने मोठ्या अपेक्षा बाळगून असलेल्या कर्जत तालुक्यातील जनतेच्या पदरी निराशाच पडली.
कर्जत तालुक्यातील कल्याण-कर्जत, खोपोली-कर्जत या रस्त्यांवर पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राज्यमंत्र्यांमुळे तरी लवकर भरले जातील, ही अपेक्षा फोल ठरली.
कार्यकारी अभियंत्यांचा घेतला समाचार चौक येथे माजी आमदार साटम यांच्या हॉटेलवर पोहोचल्यानंतर कार्यकारी अभियंता पी. बी. मोरे त्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्याच वेळी अशा पद्धतीने रस्त्यांची कामे करणाºया ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले. कर्जत रस्त्यावरील खालापूर हद्दीतील रस्त्याची पाहणी करताना राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यासोबत माजी आमदार देवेंद साटम, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा सचिव सुनील गोगटे, रायगड जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष अशोक गायकर, राजेंद्र येरुणकर, माजी जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, कर्जत तालुका अध्यक्ष दीपक बेहेरे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.