शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय --: संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 1:17 AM

शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय होते. त्यांची नीतिमत्ता, राज्यकारभाराच्या नीतीचा राज्य सरकारने अंमल करण्याची गरज आहे. मराठा आरक्षण दिले पाहिजे, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने ३४५वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा गुरुवारी रायगड येथे शिवरायांच्या जयघोषात आणि हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी खासदार संभाजीराजे यांनी

डॉ. प्रकाश मुंज ।रायगड : शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय होते. त्यांची नीतिमत्ता, राज्यकारभाराच्या नीतीचा राज्य सरकारने अंमल करण्याची गरज आहे. मराठा आरक्षण दिले पाहिजे, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने ३४५वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा गुरुवारी रायगड येथे शिवरायांच्या जयघोषात आणि हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी खासदार संभाजीराजे यांनी राजसदरेवरून शिवप्रेमींना संबोधित केले. ते म्हणाले, रायगडावर  पाण्याचे योग्य नियोजन करून १०० टक्के पाणी व्यवस्था केली जाईल. शिल्लक पाणी रायगड परिसरातील २१ गावांना देण्यात येईल. आतापर्यंत गडकिल्ल्यांसाठी कामकरत आहे. याचबरोबर इथून पुढे शेतकऱ्यांसाठी, बहुजनांसाठी काम करेन. गड-किल्ल्यांचे बनविलेले बिझनेस मॉडेल केंद्र शासनाला सादर केले जाईल, असे संभाजीराजे म्हणाले.

यावेळी चीनचे राजदूत लीयू बिंग, पोलंडचे कौन्सिल जनरल डॅमियन इरझॅक, सचिव इव्हा स्टॅनकिव्हिसिक, ट्युनिसियाचे राजदूत नेज्मेद्दिन लखाल, बल्गेरियाच्या राजदूत इलिनोरा डिमिट्रोव्हा, पालकमंत्री रवींद्र चव्हाण,आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, तहसीलदार चंद्रसेन पवार,माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखआदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठीइतिहास संशोधक, अभ्यासक, शिवभक्त, इतिहासप्रेमी हजारोंच्या संख्येने  उपस्थित होते. 

यावेळी रयतेचे प्रातिनिधिक स्वरूपात उस्मानाबादमधील मेडशिंगा येथील आत्महत्या केलेल्या आवचार या शेतकºयाच्या कुटुंबाला उपस्थित राहण्याची संधी दिली.चीनचे राजदूत लियू बिंग म्हणाले, चीन व भारताच्या संस्कृती जुन्या असून, छत्रपती शिवराय हे नॅशनल हिरो आहेत. भारत व चीनमध्ये राष्ट्रपुरुषांविषयी आदराची सामायिक भावना आहे. राष्ट्रपुरुषांकडून खूप काही शिकतो. त्यांचे स्मरण करतो.बल्गेरियाच्या राजदूत इलिनोरा डिमिट्रोव्हा यांनी शिवराय हे देशाचे स्फूर्तिस्थान आहेत, असे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली. मराठा इतिहास त्यांच्या कर्तृत्वाने समृद्ध झाला आहे.’

पोलंडचे कौन्सिल जनरल डॅमियन इरझॅक म्हणाले, ‘पोलंडवासीयांच्या वळीवडे येथील आठवणी आजही त्यांच्या स्मरणात ताज्या आहेत. शिवरायांचा इतिहास स्फूर्तिदायी असून, आदरातिथ्य करण्याची भारतवासीयांची खासीयत आहे.’मेडसिंगा (जि. उस्मानाबाद) येथील गणपती नामदेव आवचार, चिवाबाई आवचार, रेश्मा आवचार या शेतकरी कुटुंबाला संभाजीराजे यांच्या हस्ते एक लाख रुपयांची मदत देण्यात आली.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शेडमधून  शिवछत्रपतींची पालखी ढोल-ताशाच्या गजरात  शिरकाई देवीच्या मंदिराकडे मार्गस्थ झाली. हलगी, घुमकं, कैताळाच्या कडकडाटात पालखी राजसदरेवर रवाना झाली. पाठोपाठ खासदार संभाजीराजे आणि शहाजीराजे छत्रपती राजसदरेवर आले. पोलीस बँडने त्यांचे स्वागत केले. शाहीर राजेंद्र कांबळे यांनी ‘रयतेचाहा राजा झाला संभाजीराजा' हे स्वागतगीत गायिले. पोलंडच्या तिसºया सचिव इव्हा स्टॅनकिव्हिसिक, प्रांत विठ्ठल इनामदार, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे उपस्थितहोते. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनीप्रास्ताविक केले.गडकोटांसाठी स्वतंत्र  खात्याची गरजगडकोटांसाठी स्वतंत्र खाते निर्माण व्हावे,अशी अपेक्षा व्यक्त करत गडकोटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्याकरिता जपानशी पत्रव्यवहार सुरू असल्याचेखासदार संभाजीराजे यांनी यावेळी येथे सांगितले.संभाजीराजे म्हणाले, ‘गडाचा विकास करत असताना अनेकजण त्यातून मला काय फायदा होणार नाही,’ असे सांगतात. ते भुरटे आहेत. महिन्यातील दहा दिवस मी रायगडावर असतो. इथला एकेक दगड म्हणजे इतिहास आहे. मात्र, या लोकांची टिमटिम बंद झाली पाहिजे.’

रायगडचा विकास करताना अडचणी येत आहेत तरीही त्याच्यावर मात करीत कामे सुरू आहेत, असे सांगत असताना संभाजीराजे भावनिक झाले. भाषण मध्येच थांबवून ते मेघडंबरीतील शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ जाऊन नतमस्तक झाले.‘सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा’ संकल्पनेखाली काढलेल्या पालखी मिरवणुकीत अठरापगड जाती-धर्मातीललोक सहभागी झाले होते.यावेळी संभाजीराजे व शहाजीराजे यांनी मूर्तीचे पूजन केले. यावेळी शाहीर आझाद नायकवडी यांनी शिवराज्याभिषेक गीत सादर झाले. ‘जय भवानी, जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय जिजाऊ’, ‘जय शिवराय’ या घोषणा देण्यात आल्या. यंदा राजसदरेवर शेतकरी कुटुंबाला बसण्याचा मान मिळाला.इचलकरंजीचे १२०० शिवप्रेमीइचलकरंजीतून ५० गाड्यांमधून १२०० वर शिवप्रेमी रायगडावर उपस्थित होते. त्याचे नियोजन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले होते. यावेळी तेही उपस्थित होते.राज्याभिषेक, पालखी सोहळा....गुरुवारी सकाळी सात वाजता ध्वजपूजन व ध्वजारोहण झाले. त्यानंतर शाहीर रंगराव पाटील, आझाद नायकवडी यांनी शाहिरी सादर केली. साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. त्यानंतर खासदार संभाजीराजे व शहाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस राज्याभिषेक करण्यात आला.त्यानंतर मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस सुवर्णनाण्यांचा अभिषेक घालण्यात आला. ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हा शिवराज्याभिषेक मुख्य पालखी सोहळा शिवमय वातावरणात पार पडला. जगदीश्वराचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याचा समारोप झाला. यावेळी खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते समाधिस्थळी पुष्पहार अर्पण करण्यात आले.दरम्यान, दरबारातून पालखी होळीचा माळ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिराकडे जाताना पालखीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी झाली. पारंपरिक वेशभूषेत महिला, शिवभक्त, मुली सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. लेझीमच्या प्रात्यक्षिकात पालखी जगदीश्वर मंदिराकडे रवाना झाली. शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पालखी मिरवणुकीची सांगता झाली.रायगड येथे गुरुवारी ३४५वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा शिवरायांच्या जयघोषात पार पडला. रायगडावर दाखल झालेल्या शिवभक्तांमुळे परिसर असा फुलून गेला होता. यावेळी गडावर विविध युद्धकलांचे सादरीकरण करण्यात आले. 

टॅग्स :RaigadरायगडShivrajyabhishekशिवराज्याभिषेक