मुंबई ऊर्जा प्रकल्पाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; बंद पाडलेले काम पुन्हा सुरु
By वैभव गायकर | Published: November 20, 2023 07:45 PM2023-11-20T19:45:42+5:302023-11-20T19:46:11+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाबाबत वरिष्ठ पातळीवर दाद मागण्याची सुचना या प्रकल्पाबाबत निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाला केले.
पनवेल:टेंभोडे गावातुन जाणाऱ्या मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या विद्युत टॉवरला स्थानिकांनी जोरदार विरोध दर्शवला.शनिवार दि.18 रोजी या प्रकल्पाचे काम देखील बंद पाडले.याच विषयावरून दि.20 सोमवारी जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना टेंभोडे वळवली संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील,माजी आमदार पंडित पाटील,जे एम म्हात्रे ,बबन पाटील,सुदाम पाटील,प्रकाश म्हात्रे आदींसह वळवली टेंभोडे येथिल प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.या प्रकल्पाचा मार्ग गावाच्या पूर्वेला असलेल्या डोंगर भागातुन वनविभागाच्या जागेतुन नेण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाबाबत वरिष्ठ पातळीवर दाद मागण्याची सुचना या प्रकल्पाबाबत निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाला केले.एक दिवस काम बंद ठेवल्यानंतर पुन्हा सोमवारी मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केल्यानंतर पनवेल कॉग्रेसचे नेते सुदाम पाटील यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधक असल्याची टीका त्यांनी केली.