मराठा क्रांती मोर्चाची आज पाचाडमध्ये राज्यव्यापी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:25 AM2018-06-05T01:25:52+5:302018-06-05T01:25:52+5:30
राज्यभरात ५८ मोर्चे काढून देखील सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणताहि ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार खरोखरच मराठा समाजाला आरक्षण देण्यास इच्छुक आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाड : राज्यभरात ५८ मोर्चे काढून देखील सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणताहि ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार खरोखरच मराठा समाजाला आरक्षण देण्यास इच्छुक आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंगळवार, ५ जून रोजी पाचाड येथील राजमाता जिजाऊ समाधीस्थळी मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली असून बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी माहिती दिली.आजवर मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले, मात्र कुणीही मराठा समाजाच्या प्रश्नांना न्याय दिला नाही. त्यामुळेच समाजाला आता आक्र मक भूमिका घ्यावी लागत आहे. आजवर शांततामय पध्दतीने आंदोलने झाली मात्र आता शासनाला योग्य निर्णय घेण्यास भाग पाडले जाईल असेही पाटील यांनी स्पष्ट केले.