विशेष प्रतिनिधी अलिबाग : भरपूर खेळा आणि शारीरिक, मानसिकदृष्ट्या तंदुरु स्त राहा. शालेय जीवनात खेळण्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे. फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय सामने महाराष्ट्रात आयोजित करून, या खेळाशी जोडण्याची एक चांगली संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. आपण साºयांनी फुटबॉल खेळून आपली शारीरिक व मानसिक तंदुरु स्ती कमवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित महाराष्ट्र फुटबॉल मिशन १ मिलियन (१० लाख)निमित्त रायगड जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये व शाळा-महाविद्यालयांच्या मैदानावर शुक्रवारी आयोजित फुटबॉल सामन्यात पाऊस असतानाही विद्यार्थी व स्त्री-पुरुष अबालवृद्धांनी सहभागी होऊन अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. रायगड जिल्ह्याच्या मुख्य कार्यक्रमात आरसीएफ विद्यालयाच्या मैदानावर जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी फुटबॉल किकआॅफ करून या सामन्याचा शुभारंभ केला. या वेळी ते बोलत होते.कुरु ळ येथील आर.सी.एफ. मैदानावर सकाळी ८.३० वाजल्यापासून शाळकरी विद्यार्थ्यांचे फुटबॉल संघ दाखल होऊ लागले होते. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी मैदानावर जाऊन खेळाडूंचा परिचय करून घेतला. त्यानंतर नाणेफेक करून स्वत: फुटबॉलला किकआॅफ करून फुटबॉल सामन्याचा शुभारंभ केला. मैदानावर चाललेल्या रंगतदार फुटबॉल सामन्यांचे त्यांनी अवलोकन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.या वेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे, आर.सी.एफ.चे प्रशासकीय व्यवस्थापक हेमंत कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुनील सावंत, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शेषराव बढे, एस. बी. पोटपोसे, डी. टी. चौधरी, सी. व्ही. तळेगावकर, जिल्हा क्र ीडा अधिकारी महादेव कसगावडे आदी अधिकारी, तसेच विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘फिफा’ विश्वचषक कप फुटबॉल स्पर्धांचे आयोजनआॅक्टोबर, २०१७मध्ये देशात १७ वर्षांखालील मुलांसाठी ‘फिफा’ विश्वचषक कप फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये एकूण २४ देशांचे संघ सहभागी होणार असून, देशातील कोलकाता, मडगाव (गोवा), कोची (केरळ), नवी दिल्ली, गुवाहटी (आसाम) व मुंबई (महाराष्ट्र) येथे दि. ६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत फुटबॉल सामने आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडिअमवर स्पर्धेतील सहा सामन्यांचे आयोजन ६,९, १२, १८ व २५ आॅक्टोबर, २०१७ या दिवशी करण्यात आले आहेत. यानिमित्ताने शुक्रवारी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्य व आनंदासाठी फुटबॉल सामने आयोजित करण्यात आले आहेत. या अभियानानिमित्त रायगड जिल्ह्यातील ७५० प्राथमिक व माध्यमिक शाळांना या फुटबॉलचे वितरण करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
खेळून शारीरिक, मानसिकदृष्ट्या तंदुरु स्त राहा - विजय सूर्यवंशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 6:20 AM