कर्जतमध्ये जनावरे चोरण्याचा डाव फसला
By admin | Published: February 1, 2016 01:41 AM2016-02-01T01:41:02+5:302016-02-01T01:41:02+5:30
पोही येथील जनावरांना चोरट्यांनी गुंगीचे इंजेक्शन देऊन शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु एका ग्रामस्थाच्या सतर्कतेने चोरांचा
कर्जत : पोही येथील जनावरांना चोरट्यांनी गुंगीचे इंजेक्शन देऊन शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु एका ग्रामस्थाच्या सतर्कतेने चोरांचा जनावरे चोरण्याचा डाव फसला आणि ते गाडीसह पळून गेले. याबाबत पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ - कळंब रस्त्यालगत पोही गाव असून गावातील सदाशिव म्हसे यांचा एक बैल अरु ण नाना भोईर पोही यांची एक गाय व मारु ती भोईर यांचा एक बैल अशा तीन जनावरांना मानेवर गुंगीचे औषध देऊन जनावरे पळविण्याचा प्रयत्न होता.
चोरट्यांनी आपली सफेद रंगाची पिकअप गाडी नेरळ - कळंब रस्त्यावर उभी करून येथील तीन जनावरांना शनिवारी पहाटे ३.३० च्या सुमारास गुंगीचे औषध दिले व ती जनावरे पळविण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी मधुकर भोईर हे झोपेतून जागे झाले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. ते ओरडताच चोर गाडीसह नेरळच्या दिशेने पळून गेले. दोन वर्षांपूर्वीही पोही गावातील एका शेतकऱ्याचे बैल चोरून नेल्याची घटना घडली होती. परंतु त्याचा तपास अद्याप लागला नाही.
सकाळी गुंगीचे इंजेक्शन दिलेल्या जनावरांना कळंब येथील पशुवैद्यकीय रु ग्णालयात नेण्यात आले. तेव्हा हे गुंगीचे औषध दिल्यानंतर जनावरे सुमारे सात ते आठ तास गुंगीत असतात, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु जनावरे चोरणाऱ्यांचा पोलिसांनी लवकरात लवकरच शोध घ्यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)