‘बल्लाळेश्वर’ पार्र्किंगमध्ये गाडीतून लॅपटॉप चोरी
By admin | Published: October 3, 2015 02:27 AM2015-10-03T02:27:20+5:302015-10-03T02:27:20+5:30
महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे श्रीक्षेत्र बल्लाळेश्वर मंदिराच्या मोफत पार्किंगमध्ये गुरु वारी रात्री पावसाचा फायदा घेत चोरट्याने स्वीफ्ट कारची समोरील काच
पाली : महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे श्रीक्षेत्र बल्लाळेश्वर मंदिराच्या मोफत पार्किंगमध्ये गुरु वारी रात्री पावसाचा फायदा घेत चोरट्याने स्वीफ्ट कारची समोरील काच फोडून लॅपटॉपची चोरी केली. या घटनेमुळे पार्र्किं गमध्ये गाड्या लावणाऱ्या मालक व चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ठाणे येथील मंगेश माणिकराव वसू हे आपल्या कुटुंबीयांसोबत श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रात्री साडे आठ वाजता आले. वाहनतळावर गाडी लावून ते दर्शनासाठी गेले. याच वेळेस जोरात पाऊस सुरु झाला व विद्युत पुरवठा बंद झाला. अंधाराचा फायदा घेत चोरट्याने गाडीची काच फोडून गाडीतील लॅपटॉपची बॅग व मोबाइलसह कॅमेरा व इतर साहित्य चोरु न नेले. दर्शन आटोपून मंगेश वसू गाडीकडे आले त्यावेळी काच फोडून चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पाली पोलीस स्टेशनमध्ये घटनेची तक्रार केली.
पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व परिसरात पाहणी केली असता वाहन तळाशेजारीच असलेल्या आरोग्य केंद्राच्या शवविच्छेदनाच्या खोलीजवळ बॅग आढळली व त्यात मोबाइलसह लॅपटॉप सापडला मात्र पावसात ही बॅग संपूर्ण भिजल्यामुळे वस्तूचे नुकसान झाले. चोरट्याने कोणत्या हेतूने चोरी केली ते समजू शकले नाही.
बल्लाळेश्वर देवस्थानचे गणेश भक्तांसाठी दीड एकर जागेचे हे डांबरीकरण केलेले पार्र्किं ग आहे. मात्र पार्किंगमध्ये सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्हीची सोय नाही. रात्रीच्या वेळेस या वाहनतळावर बऱ्याच गणेश भक्तांच्या गाड्या उभ्या असतात त्या गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चोऱ्या व गैरप्रकार थांबविण्याच्या दृष्टीने देवस्थानकडून वाहनतळावर सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षकाची व्यवस्था करण्यासंबंधीचे विनंती पत्र पाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी देवस्थानला दिले आहे.
याबाबत देवस्थानचे अध्यक्ष अॅड. धनंजय धारप म्हणाले की, श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या गणेशभक्तांच्या वाहनांची तोडफोड करुन झालेली चोरी ही गंभीर बाब असून लवकरच देवस्थानच्या वतीने संपूर्ण वाहनतळावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील व सुरक्षा रक्षकाची सोय करण्यात येईल. (वार्ताहर)