उरणमध्ये कलमारखाली चिरडून कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:55 PM2019-05-03T23:55:19+5:302019-05-03T23:55:36+5:30

सीबर्ड कंटेनर गोदामातील घटना : संतप्त कामगारांनी काम पाडले बंद

Sterilize the body of a worker under the skin of the pen | उरणमध्ये कलमारखाली चिरडून कामगाराचा मृत्यू

उरणमध्ये कलमारखाली चिरडून कामगाराचा मृत्यू

googlenewsNext

उरण : अनेक अपघातांची मालिका सुरू असणाऱ्या उरण द्रोणागिरी परिसरातील सीबर्ड कंटेनर गोदामांमध्ये शुक्रवारी कंपनीच्या आवारामध्ये कलमारखाली एक कामगार चिरडून जागीच ठार झाल्याने कंपनीतील कामगारात संतापाची लाट उसळली. रौद्र अवतार धारण केलेल्या कामगारांनी कंपनीचे कामकाज बंद पाडले आहे.

कंपनीत कंटेनर हाताळणीचे कामकाज नियमित सुरू असताना शुुक्र वारी दुुपारी ३.३० वाजताचे सुमारास अपघात घडला. या कंटेनर गोदामात कलमार क्र मांक एम.एच.४३-२१८३ हे कंटेनर हाताळणीचे काम चालू असतांना कंटेनर ट्रेलरवर ठेवताना ते मागेपुढे करीत असताना कलमार क्रेनच्या बाजूने जात असणारा ग्लोबल लॉजिस्टिक कंपनीमध्ये सीएचए म्हणून काम करीत असलेला किरण कोरडे (३०) हा तरु ण तेथून जात होता. कलमार चालकाच्या हलगर्जीमुळे कलमारचा जोरदार धक्का लागून तो जागीच कोसळला आणि कलमारच्या पुढच्या चाकाखाली आला. चालकाला ही गोष्ट न समजल्याने न थांबविता कलमार तसाच पुढे चालू ठेवल्याने तरु ण अवजड चाकात गुंडाळून सुमारे १५ ते २० फुटांपेक्षा अधिक अंतरावर फरफटत गेला. त्यामुळे किरण कोरडे याच्या शरीराच्या चिंधड्या होऊन तो जागीच ठार झाला.

ही घटना कामगारांच्या निदर्शनास येताच कामगारांनी काम बंद करून हल्लाबोल केला. या गडबडीत संधी साधून कलमार चालक फरार झाला. मात्र या चालकास फरार करण्यामध्ये सीबर्ड कंटेनर गोदामाचे मुख्य व्यवस्थापकांंचा हात असल्याचे येथील कामगारांचे म्हणणे आहे. यामुळे संतप्त कामगारांनी तात्काळ कंपनीचे कामकाज बंद केले. यावेळी कामगारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या अगोदर कार्यरत असलेल्या मुख्य व्यवस्थापक अविनाश याने कलमार मशिन सुरू असताना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये या सुरक्षतेसाठी व्यवस्थापकांनी कलमारच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कामगारांची व्यवस्था ठेवली होती. नव्याने कंपनीची सूत्रे हाती घेतलेल्या व्यवस्थापनाने कामगार कपातीच्या नावाखाली ही सुरक्षा काढून टाकल्याने हा दुर्दैवी अपघात घडला असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. ही घटना समजताच घटनेचे गांभीर्य जाणून उरण पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले, मृतदेह हलवून उरण येथील इंदिरा गांधी रुग्णालयात नेला. या घटनेने कामगारांच्या संतापाचा उद्रेक होऊन पोलिसांसोबतही बाचाबाची झाली.

मृत कामगाराच्या पत्नीस ५० लाखांची नुकसानभरपाई देण्याची मागणी
दरम्यान सीबर्ड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवासन याही दुर्घटना समजताच ते कंपनीमध्ये उपस्थित झाले.यावेळी कामगारांकडून मृत व्यक्तीच्या पत्नीस ५० लाख नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. किरण कोरडे यांची पत्नी ही पोलिस दलात नोकरी असल्याचे समजते. या कंपनीत आजही ७० वर्षीय वयाचा कलमार चालक असून ,दोनच दिवसांपूर्वी या व्यक्तीकडून रचून ठेवण्यात आलेल्या कंटेनरना धक्का लागल्याने अपघात झाला होता. यावेळी कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी,कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे येथील कामगारांनी सांगितले.

Web Title: Sterilize the body of a worker under the skin of the pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात