शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

उरणमध्ये कलमारखाली चिरडून कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 11:55 PM

सीबर्ड कंटेनर गोदामातील घटना : संतप्त कामगारांनी काम पाडले बंद

उरण : अनेक अपघातांची मालिका सुरू असणाऱ्या उरण द्रोणागिरी परिसरातील सीबर्ड कंटेनर गोदामांमध्ये शुक्रवारी कंपनीच्या आवारामध्ये कलमारखाली एक कामगार चिरडून जागीच ठार झाल्याने कंपनीतील कामगारात संतापाची लाट उसळली. रौद्र अवतार धारण केलेल्या कामगारांनी कंपनीचे कामकाज बंद पाडले आहे.

कंपनीत कंटेनर हाताळणीचे कामकाज नियमित सुरू असताना शुुक्र वारी दुुपारी ३.३० वाजताचे सुमारास अपघात घडला. या कंटेनर गोदामात कलमार क्र मांक एम.एच.४३-२१८३ हे कंटेनर हाताळणीचे काम चालू असतांना कंटेनर ट्रेलरवर ठेवताना ते मागेपुढे करीत असताना कलमार क्रेनच्या बाजूने जात असणारा ग्लोबल लॉजिस्टिक कंपनीमध्ये सीएचए म्हणून काम करीत असलेला किरण कोरडे (३०) हा तरु ण तेथून जात होता. कलमार चालकाच्या हलगर्जीमुळे कलमारचा जोरदार धक्का लागून तो जागीच कोसळला आणि कलमारच्या पुढच्या चाकाखाली आला. चालकाला ही गोष्ट न समजल्याने न थांबविता कलमार तसाच पुढे चालू ठेवल्याने तरु ण अवजड चाकात गुंडाळून सुमारे १५ ते २० फुटांपेक्षा अधिक अंतरावर फरफटत गेला. त्यामुळे किरण कोरडे याच्या शरीराच्या चिंधड्या होऊन तो जागीच ठार झाला.

ही घटना कामगारांच्या निदर्शनास येताच कामगारांनी काम बंद करून हल्लाबोल केला. या गडबडीत संधी साधून कलमार चालक फरार झाला. मात्र या चालकास फरार करण्यामध्ये सीबर्ड कंटेनर गोदामाचे मुख्य व्यवस्थापकांंचा हात असल्याचे येथील कामगारांचे म्हणणे आहे. यामुळे संतप्त कामगारांनी तात्काळ कंपनीचे कामकाज बंद केले. यावेळी कामगारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या अगोदर कार्यरत असलेल्या मुख्य व्यवस्थापक अविनाश याने कलमार मशिन सुरू असताना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये या सुरक्षतेसाठी व्यवस्थापकांनी कलमारच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कामगारांची व्यवस्था ठेवली होती. नव्याने कंपनीची सूत्रे हाती घेतलेल्या व्यवस्थापनाने कामगार कपातीच्या नावाखाली ही सुरक्षा काढून टाकल्याने हा दुर्दैवी अपघात घडला असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. ही घटना समजताच घटनेचे गांभीर्य जाणून उरण पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले, मृतदेह हलवून उरण येथील इंदिरा गांधी रुग्णालयात नेला. या घटनेने कामगारांच्या संतापाचा उद्रेक होऊन पोलिसांसोबतही बाचाबाची झाली.

मृत कामगाराच्या पत्नीस ५० लाखांची नुकसानभरपाई देण्याची मागणीदरम्यान सीबर्ड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवासन याही दुर्घटना समजताच ते कंपनीमध्ये उपस्थित झाले.यावेळी कामगारांकडून मृत व्यक्तीच्या पत्नीस ५० लाख नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. किरण कोरडे यांची पत्नी ही पोलिस दलात नोकरी असल्याचे समजते. या कंपनीत आजही ७० वर्षीय वयाचा कलमार चालक असून ,दोनच दिवसांपूर्वी या व्यक्तीकडून रचून ठेवण्यात आलेल्या कंटेनरना धक्का लागल्याने अपघात झाला होता. यावेळी कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी,कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे येथील कामगारांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात