‘जलयुक्त’साठी अजूनही १२ कोटींची गरज
By admin | Published: November 20, 2015 02:22 AM2015-11-20T02:22:26+5:302015-11-20T02:22:26+5:30
जलयुक्त शिवार योजनेतून साडेतेराशे कामांसाठी सुमारे ४२ कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्यापैकी ३५१ कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी सात कोटी ३५ लाख ५७८ हजार रुपयांचा
- आविष्कार देसाई, अलिबाग
जलयुक्त शिवार योजनेतून साडेतेराशे कामांसाठी सुमारे ४२ कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्यापैकी ३५१ कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी सात कोटी ३५ लाख ५७८ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. जिल्ह्याला १२ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. १४ कामे प्रगतिपथावर असली, तरी ३१ मार्च अखेर सर्व कामांचा निपटारा करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पेलावे लागणार आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पाऊस पडून देखील नियोजना अभावी पाणीटंचाईला सप्टेंबर महिन्यापासूनच सुरुवात होते. विविध नळपाणी पुरवठ्याच्या योजनाची कामेही जिल्ह्यात मोठ्या संख्येने सुरु असतानाच जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यात एक हजार ३५० कामे सुचविण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार योजनेसाठी सुमारे ४२ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जिल्ह्यात ३५१ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यासाठी सात कोटी ३८ लाख ९० हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. १४ कामे प्रगतिपथावर आहेत. जिल्ह्याला अद्यापही १२ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून सीएसआर फंडातून जिल्हा प्रशासनाला फक्त दोन कोटी रुपयेच प्राप्त झाले आहेत. आवश्यक निधी प्राप्त झाल्यावर मार्चअखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करता येतील असे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी के.बी. तरकसे यांनी सांगितले.
२६ जानेवारीमध्ये या कामांना सुरुवात झाली होती. योजना समजावून घेत पावसाळा सुरु झाला. त्यामुळे पावसाळ््यात कामाची गती मंदावली होती. आता कामाला पुन्हा जोमाने सुरुवात झाली आहे.
जलयुक्त शिवार योजनेतील झालेली कामे
सलग समतल बंधारा, माती नाला बंधारा, दगडी बंधारा, गॅबियन बंधारा, शेततळे, बंधारा दुरुस्ती, वळण बंधारे, सिमेंट बंधारे उभारण्यात आले आहेत. अलिबाग तालुक्यात १५ कामे झाली असून यासाठी १७ लाख ७६ हजार खर्च आला. पेणमध्ये ३४ कामे ६२.९८ खर्च, मुरुड २४ कामे ०७.०४ खर्च, खालापूर ४८ कामे ९८.१९ खर्च, कर्जत २८ कामे १३८.२९ खर्च.
पनवेल २३ कामे झाली असून यासाठी १०२ लाख ४६ हजार रुपये खर्च आला आहे. माणगाव तालुक्यात ७ कामे ३.४८ खर्च , तळा १८ कामे ३२.४५ खर्च , रोहे ४६ कामे ३६.१० खर्च, सुधागड-पाली १२ कामे ३४.८० खर्च, ंमहाड ३७ कामे ९१.९६ खर्च, पोलादपूर ४३ कामे १९.०५ खर्च, म्हसळा ४ कामे १२.०५ खर्च , श्रीवर्धन ३६ कामे ८१.७४ खर्च.
जलयुक्त शिवार योजनेतील कामे
सलग समतल बंधारा, माती नाला बंधारा, दगडी बंधारा, गॅबियन बंधारा, शेततळे, बंधारा दुरुस्ती, वळण बंधारे, सिमेंट बंधारे उभारण्यात आले आहेत. या कामांचा या योजनेमध्ये समावेश आहे.