उलवा टेकडीवरील स्फोट थांबवा, जिल्हाधिकाºयांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 07:23 AM2018-01-30T07:23:45+5:302018-01-30T07:24:01+5:30

सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. उलवा टेकडीवरील बौद्ध लेण्या परिसरात सुरुंग स्फोटामुळे जबरदस्त हादरे बसत असल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे.

 Stop the blast on Ulva hill, demand of District Collector | उलवा टेकडीवरील स्फोट थांबवा, जिल्हाधिकाºयांकडे मागणी

उलवा टेकडीवरील स्फोट थांबवा, जिल्हाधिकाºयांकडे मागणी

Next

अलिबाग : सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. उलवा टेकडीवरील बौद्ध लेण्या परिसरात सुरुंग स्फोटामुळे जबरदस्त हादरे बसत असल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. या स्फोटांच्या दारूगोळ्यामधील सूक्ष्म विषारी कणांचा नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची तक्र ार कोंबडभुजे येथील धनगर समाज रहिवासी मंडळ तसेच कोंबडभुजे गावातील कोळी समाजाने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. सिडकोने सुरू केलेले सुरुंग स्फोट तातडीने थांबवावेत, स्फोटामुळे जखमी झालेल्यांचा खर्च सिडकोने करावा, तसेच परिसरातील नागरिकांचा विमा काढावा, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. मागण्यांबाबत गांभीर्याने विचार न केल्यास परिसरातील सर्व ग्रामस्थ सिडकोच्या हुकूमशाहीविरोधात साखळी उपोषण आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
घरातील लहान मुले ही स्फोटकांच्या आवाजामुळे भयभीत झालेली आहेत. तसेच स्फोटकांच्या आवाजामुळे घराच्या बाहेर पडताना जीव मुठीत घेऊन बाहेर जावे लागत असल्याचे तक्र ारदार नामदेव बुधाजी कोळी यांनी निवेदनात नमूद केले आहे. सिडकोच्या माध्यमातून ६ जानेवारी २०१८ रोजी सुरू झालेल्या सुरु ंग स्फोटात सिध्दार्थनगर येथे काम करणारे दोन अभियंते आणि कर्मचारी ठार झाल्याची घटना ताजी आहे. सिध्दार्थनगर या मागासवर्गीयांच्या वस्तीवर दगड पडून लहान मुलांच्या डोक्याला दुखापत झाल्याबाबतच्या तक्रारी एन.आर.आय. पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. स्फोटांसाठी वापरण्यात येणाºया दारूगोळ्यामधील सूक्ष्म विषारी कण हे हवेतील धुलीकणांमध्ये मिसळून स्थानिकांना श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक त्रास हा लहान मुले आणि वयोवृध्दांना जाणवत असल्याचे कोळी यांचे म्हणणे आहे. नागरिकांमध्ये स्फोटकांमध्ये वापरण्यात येणाºया दारूगोळ्याबाबत भीती निर्माण झाली आहे. स्फोट होणाºया परिसरात प्रत्येक गावात एक अ‍ॅम्ब्युलन्स, तज्ज्ञ डॉक्टर व सहकारी देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

वीटभट्टीचा परंपरागत व्यवसाय धोक्यात
च्परिसरातील कांचन कृष्णा कोळी यांचा चार एकर सहा गुंठे क्षेत्रावर वीटभट्टीचा परंपरागत व्यवसाय आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचे तेच साधन आहे. त्याचप्रमाणे याच व्यवसायावर आदिवासी समाजही अवलंबून आहे.
च्सिडकोने वीटभट्टीच्या भोवती भरावाचे काम सुरू केले आहे. हे क्षेत्र आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित क्षेत्र आहे.
च्५० लाख रु पयांची वार्षिक उलाढाल असणाºया आणि ३० वर्षांपासून सुरू असलेल्या या व्यवसायाला भूसंपादन कायदा २०१३ नुसार नुकसान भरपाई मिळण्यासाठी सर्वेक्षण, पंचनामे होणे गरजेचे आहे.
च्यासाठी पनवेल तहसीलदार, भूमी अभिलेख, मेट्रो सेंटर-१ आणि सिडको यांना आदेश द्यावेत अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले आहे.

Web Title:  Stop the blast on Ulva hill, demand of District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत