शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

उलवा टेकडीवरील स्फोट थांबवा, जिल्हाधिकाºयांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 7:23 AM

सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. उलवा टेकडीवरील बौद्ध लेण्या परिसरात सुरुंग स्फोटामुळे जबरदस्त हादरे बसत असल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे.

अलिबाग : सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. उलवा टेकडीवरील बौद्ध लेण्या परिसरात सुरुंग स्फोटामुळे जबरदस्त हादरे बसत असल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. या स्फोटांच्या दारूगोळ्यामधील सूक्ष्म विषारी कणांचा नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची तक्र ार कोंबडभुजे येथील धनगर समाज रहिवासी मंडळ तसेच कोंबडभुजे गावातील कोळी समाजाने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. सिडकोने सुरू केलेले सुरुंग स्फोट तातडीने थांबवावेत, स्फोटामुळे जखमी झालेल्यांचा खर्च सिडकोने करावा, तसेच परिसरातील नागरिकांचा विमा काढावा, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. मागण्यांबाबत गांभीर्याने विचार न केल्यास परिसरातील सर्व ग्रामस्थ सिडकोच्या हुकूमशाहीविरोधात साखळी उपोषण आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.घरातील लहान मुले ही स्फोटकांच्या आवाजामुळे भयभीत झालेली आहेत. तसेच स्फोटकांच्या आवाजामुळे घराच्या बाहेर पडताना जीव मुठीत घेऊन बाहेर जावे लागत असल्याचे तक्र ारदार नामदेव बुधाजी कोळी यांनी निवेदनात नमूद केले आहे. सिडकोच्या माध्यमातून ६ जानेवारी २०१८ रोजी सुरू झालेल्या सुरु ंग स्फोटात सिध्दार्थनगर येथे काम करणारे दोन अभियंते आणि कर्मचारी ठार झाल्याची घटना ताजी आहे. सिध्दार्थनगर या मागासवर्गीयांच्या वस्तीवर दगड पडून लहान मुलांच्या डोक्याला दुखापत झाल्याबाबतच्या तक्रारी एन.आर.आय. पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. स्फोटांसाठी वापरण्यात येणाºया दारूगोळ्यामधील सूक्ष्म विषारी कण हे हवेतील धुलीकणांमध्ये मिसळून स्थानिकांना श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक त्रास हा लहान मुले आणि वयोवृध्दांना जाणवत असल्याचे कोळी यांचे म्हणणे आहे. नागरिकांमध्ये स्फोटकांमध्ये वापरण्यात येणाºया दारूगोळ्याबाबत भीती निर्माण झाली आहे. स्फोट होणाºया परिसरात प्रत्येक गावात एक अ‍ॅम्ब्युलन्स, तज्ज्ञ डॉक्टर व सहकारी देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.वीटभट्टीचा परंपरागत व्यवसाय धोक्यातच्परिसरातील कांचन कृष्णा कोळी यांचा चार एकर सहा गुंठे क्षेत्रावर वीटभट्टीचा परंपरागत व्यवसाय आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचे तेच साधन आहे. त्याचप्रमाणे याच व्यवसायावर आदिवासी समाजही अवलंबून आहे.च्सिडकोने वीटभट्टीच्या भोवती भरावाचे काम सुरू केले आहे. हे क्षेत्र आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित क्षेत्र आहे.च्५० लाख रु पयांची वार्षिक उलाढाल असणाºया आणि ३० वर्षांपासून सुरू असलेल्या या व्यवसायाला भूसंपादन कायदा २०१३ नुसार नुकसान भरपाई मिळण्यासाठी सर्वेक्षण, पंचनामे होणे गरजेचे आहे.च्यासाठी पनवेल तहसीलदार, भूमी अभिलेख, मेट्रो सेंटर-१ आणि सिडको यांना आदेश द्यावेत अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले आहे.

टॅग्स :Indiaभारत