टेंभरे येथे गावठी दारू बंद
By admin | Published: September 30, 2015 12:13 AM2015-09-30T00:13:10+5:302015-09-30T00:13:10+5:30
ग्रुप ग्रामपंचायत टेंभरे हद्दीतील रजपे कातकरवाडी येथे गावठी दारू पूर्णत: बंद झाली. त्यामुळे आदिवासींची होणारी वाताहत थांबणार आहे
कर्जत : ग्रुप ग्रामपंचायत टेंभरे हद्दीतील रजपे कातकरवाडी येथे गावठी दारू पूर्णत: बंद झाली. त्यामुळे आदिवासींची होणारी वाताहत थांबणार आहे व त्यांची खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची सुरुवात होणार आहे.
ग्रामपंचायत टेंभरेचे उपसरपंच हरेश घुडे व प्रमोद पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रजपे कातकरवाडी येथील गावठी दारू बंद झाली. राजपे कातकरवाडी येथे गावठी दारू मोठ्या प्रमाणात तयार होत असल्यामुळे
तरु णांना त्याचे व्यसन लागले, त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.मात्र दारू बंद झाल्यामुळे आता महिलांची होणारी पिळवणूक ही पूर्णत: थांबली आहे. गावठी दारू बंद करण्यासाठी कर्जतचे उपनिरीक्षक रमेश भोसले यांनी सहकार्य केले असून अनेक आदिवासी कुटुंबांना रोजगाराची दिशा दिली. रजपे गावातील तरु णांनी पुन्हा या रजपे कातकरवाडीमध्ये गावठी दारू कदापि होणार नाही याची काळजी आम्ही गावकरी घेऊ असे आश्वासन दिले आहे. रजपे गावातील दारु बंदीसाठी तंटामुक्ती अध्यक्ष विश्वनाथ घुडे, रामचंद्र पिंगळे, योगेश घुडे, अंकुश शेडगे आदींनी पुढाकार घेतला.