कर्जत : कोरोना संक्रमित शहरातून येणा-या गाड्यांना कर्जतमध्ये येण्यास प्रतिबंध व चालक, कामगारांची स्क्रीनिंग टेस्ट करण्याची मागणी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी तहसील कार्यालयात निवेदन देऊन केली आहे.कर्जत शहरात अद्याप कोरोना संसर्गबाधित एकही रुग्ण आढळला नाही. मात्र त्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशाची तसेच कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून अमलात आणलेली उपाययोजना सार्थकी ठरली आहे. लॉकडाउन असल्याने सर्वत्र बाजारपेठा बंद आहेत. मात्र अत्यावश्यक सेवेतून कर्जत शहरात भाजी, अन्नधान्य व इतर वस्तूंची मालवाहतूक करणारे ट्रक, टेम्पो, इतर गाड्या येत आहेत. या मालवाहतूक करणाºया गाड्या कोरोना संक्रमित मुंबई, नवी मुंबई, वाशी, पुणे, कल्याण, बदलापूर व इतर शहरांतून येत असल्याने त्या गाड्यांचे चालक, कामगार यांच्यामार्फत कोरोना विषाणू कर्जत शहरात येऊन त्यांच्या संपर्कामुळे इतरांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही वाहने कर्जत शहरात येण्यास प्रतिबंध करून या वाहनचालकांची तसेच गाड्यांवरील इतर कामगारांची कर्जत शहराच्या बाहेरच स्क्रीनिंग टेस्ट करून शहरात पाठविण्याची मागणी कर्जत येथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगराध्यक्षा जोशी यांनी के लीआहे .
कोरोना संक्रमित शहरातून येणाऱ्या गाड्यांना थांबवा, नगराध्यक्षांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 2:10 AM