खाडीपट्ट्यातील प्रदूषणाचा मुद्दा पेटला , म्हाप्रळ-पंढरपूर मार्गावर दोन तास रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 01:28 AM2017-12-21T01:28:02+5:302017-12-21T01:28:38+5:30

महाड औद्योगिक वसाहतीमधून घातक रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन वारंवार ओव्हरफ्लो होत आहे. महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात नेहमी होणा-या घातक रसायन सांडपाण्याच्या गळतीवर वारंवार तक्रार होवून देखील औद्योगिक वसाहत

 Stop the two-hour road blockade on the Mhatral-Pandharpur road | खाडीपट्ट्यातील प्रदूषणाचा मुद्दा पेटला , म्हाप्रळ-पंढरपूर मार्गावर दोन तास रास्ता रोको

खाडीपट्ट्यातील प्रदूषणाचा मुद्दा पेटला , म्हाप्रळ-पंढरपूर मार्गावर दोन तास रास्ता रोको

Next

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमधून घातक रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन वारंवार ओव्हरफ्लो होत आहे. महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात नेहमी होणा-या घातक रसायन सांडपाण्याच्या गळतीवर वारंवार तक्रार होवून देखील औद्योगिक वसाहत अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहेत. बुधवारी या विभागात गोळे गाव हद्दीत व रावढळ गाव हद्दीत अचानक ही पाइपलाइन लिकेज होवून मोठ्या प्रमाणात घातक रासायनिक सांडपाणी वाहू लागले. अनेक नागरिकांनी याची तक्रार करून देखील कोणी अधिकारी याकडे फिरकला नसल्याने या विभागात सकाळपासूनच वातावरण तापले. दुपारी ५ तासांनंतर या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पोहोचल्यानंतर नागरिकांनी त्यांना घेराव घातला. याची माहिती माजी आ. माणिक जगताप यांना मिळाल्याने तेही त्या ठिकाणी पोहोचले व नागरिकांसोबत दोन तास रस्त्यावर बसून रास्ता रोको करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली.
जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत रास्ता रोको थांबणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठांकडून फोनवरून कारवाईचे आश्वासनानंतर रास्ता रोको थांबविण्यात आला.
गेली ३० वर्षे महाड औद्योगिक वसाहत ही महाडकर नागरिकांना डोकेदुखी बनली आहे. संपूर्ण महाड तालुका या औद्योगिक क्षेत्रामुळे प्रदूषित झाला आहे. या औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणारा सावित्री खाडीला घातक रसायनयुक्त पाणी याची नेहमी पाइपलाइन ओव्हर फ्लो होऊन फुटत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेती नापीक झाली असून वेगवेगळ्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. बुधवारी महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील रावढळ या गाव हद्दीत हीच घातक रसायनयुक्त सांडपाण्याच्या पाइपलाइनला गळती लागली, तसेच दुसºया पाइपलाइनला गोठे गाव हद्दीत गळती लागली. रावढळ गाव हद्दीत गळती होणाºया पाइपलाइनचे घातक रसायनयुक्त सांडपाणी थेट नागेश्वरी नदीत मिसळू लागले. या नदीवर एक छोटासा बंधारा असून वरच्या बाजूस बामणे, सापे, अप्पर तुडील, भेलोशी, नरवन, आद्रे, खुटील या गावांच्या पिण्याच्या पाण्याची जॅकवेल आहे. सकाळी ९ वा. लिकेज झालेली पाइपलाइनची तक्रार देवून महाड औद्योगिक वसाहत क्षेत्रामधून एकही अधिकारी याकडे फिरकला नसल्याने दुपारी या विभागातील नागरिकांचा संताप वाढला व शेकडो नागरिक विरोधात रस्त्यावर उतरले. याची माहिती माजी आ. माणिक जगताप यांना मिळताच त्यांनी त्या ठिकाणी जावून पाच तासांनंतर त्या ठिकाणी पोहोचलेल्या प्रदूषण मंडळाचे अधिकारी माने तसेच महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक यांना विचारणा करता अद्याप कारवाई काय झाली याची माहिती घेत नागरिकांसोबत रस्त्यावर ठाण मांडून तब्बल दोन तास रास्ता रोको करत संबंधित अधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या रास्ता रोकोमध्ये खाडीपट्टा विभागातील शेकडोंनी भाग घेतला होता.
स्थानिकांना नोकºया नाहीत
या रास्ता रोकोदरम्यान माणिक जगताप यांनी कारखानदारांवर आरोप करत स्थानिक लोकांना नोकºया दिल्या जात नाही. सध्या ८० टक्के परप्रांतीय कारखानदारांमध्ये काम करत असून २० टक्के फक्त स्थानिक कामगार काम करत आहेत. कारखानदार काहीना काही कारण दाखवत स्थानिक कामगारांना नोकºया देत नसल्याचा आरोप यावेळी केला. मात्र यापुढे ही बाब सहन केली जाणार नाही. या विरोधात आंदोलनाचा इशाराही दिला.
वसुंधरा अ‍ॅवॉर्डवर आक्षेप
काही महिन्यापूर्वीच सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला वसुंधरा अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे. यावर माणिक जगताप यांनी आक्षेप घेत प्रदूषणमुक्त झाला आहे. मग खाडीपट्ट्यात होणारे प्रदूषण कुठले.
महाड औद्योगिक वसाहतीतील प्रिव्ही आॅर्गनिक्स हा कारखाना मोठा प्रदूषणकारी असून त्याचा मॅनेजरच सामाईक सांडपाणी केंद्राचा अध्यक्ष आहे. त्यामुळे या सर्व प्रदूषणाला कारणीभूतच हा कारखाना आहे. चोर पण हेच, चोºया करणारे पण हेच अशी टीका जगताप यांनी करत वसुंधरा अ‍ॅवॉर्ड मिळाला कसा यावर संशय व्यक्त केला.
सध्या या विभागात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली असून प्रत्येक गावात १० पेशंट कॅन्सरचे असून टीबी, दमा इतर आजाराने हा विभाग ग्रासला असून या प्रदूषणामुळेच हे आजार उद्भवले असल्याचा आरोप माजी आ. माणिक जगताप यांनी यावेळी केला.

Web Title:  Stop the two-hour road blockade on the Mhatral-Pandharpur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.