पाणीपुरवठा योजनेच्या साठवण विहिरीत शेवाळ, वर्षभरात विहिरींची साफसफाईच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 02:07 AM2019-05-08T02:07:00+5:302019-05-08T02:07:18+5:30

बिरदोले गावाजवळ उल्हासनदीलगत असलेल्या पोशीर पाणीपुरवठा योजनेच्या साठवण टाकीची दुरवस्था झाली असून, टाकीतील पाण्यावर शेवाळ, जलपर्णीचे थर साचले आहेत. वर्षभरात एकदाही या साठवण टाकीची साफसफाई केली नसल्याने पाण्यावर जलपर्णी साचली आहे.

Storage of water supply scheme, well washed in the well, there is no clearance of wells during the year | पाणीपुरवठा योजनेच्या साठवण विहिरीत शेवाळ, वर्षभरात विहिरींची साफसफाईच नाही

पाणीपुरवठा योजनेच्या साठवण विहिरीत शेवाळ, वर्षभरात विहिरींची साफसफाईच नाही

Next

- कांता हाबळे

नेरळ : बिरदोले गावाजवळ उल्हासनदीलगत असलेल्या पोशीर पाणीपुरवठा योजनेच्या साठवण टाकीची दुरवस्था झाली असून, टाकीतील पाण्यावर शेवाळ, जलपर्णीचे थर साचले आहेत. वर्षभरात एकदाही या साठवण टाकीची साफसफाई केली नसल्याने पाण्यावर जलपर्णी साचली आहे.
पोशीर ग्रामपंचायतीची १९६७ पासून अस्तित्वात असलेली जुनी पाणीपुरवठा योजना अखेरच्या घटका मोजत असल्याने या मोठ्या लोकसंख्येच्या पोशीर व त्यासोबत चिकणपाडा या गावांना पाणीपुरवठा करणे दुष्कर बनले होते. रायगड जिल्हा परिषदेच्या कळंब प्रभागातील सदस्य सुदाम पेमारे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय पेयजल योजनेतून एक कोटी २५ लाख रु पये इतक्या निधीची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. ही योजना पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या जलवाहिनीस गळती लागल्याचे यापूर्वी अनेकदा घडले आहे. या नवीन पाणीयोजनेला अजून दोन वर्षेही पूर्ण झाली नाहीत आणि तिची अशी दुरवस्था झाली आहे, त्यामुळे या योजनेचे भवितव्य काय? असा प्रश्न उभा ठाकला आहे.

या पाणीयोजनेबाबत पोशीर ग्रामपंचायत आपली जबाबदारी झटकत असून या वर्षभरातच या योजनेचा बोजवारा उडाला आहे. या योजनेच्या बिरदोले येथील साठवण टाकीत शेवाळ आणि जलपर्णी वाढल्याने पृष्ठभागावरील पाणी पूर्ण झाकून गेले आहे, साठवण टाकीच्या या अवस्थेकडे लक्ष देण्यास ग्रामपंचायतीला वेळ नाही. २०१७ पासून आजतागायत दीड वर्षे पूर्ण होऊनदेखील ही योजना पोशीर ग्रामपंचायतीने अद्याप ताब्यात घेतली नाही, त्यामुळे तिच्या देखभाल दुरु स्तीचा खर्च पोशीर गाव पाणीपुरवठा समितीकडून केला जातो. मागील काही ग्रामसभांमध्ये हा मुद्दा वारंवार चर्चेस आला आहे. मात्र, ही योजना ग्रामपंचायत का स्वीकारत नाही याबद्दल अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. अद्याप ही योजना पोशीर ग्रामपंचायतीने ताब्यात न घेतल्याने पाणीपुरवठा समितीला तिची देखभाल दुरु स्ती करावी लागत आहे. या पाणीपुरवठा योजनेकरिता आलेले विद्युत बिल पाणीपुरवठा समितीला पाणीपट्टी वसूल करून भरावे लागत आहे. त्यातूनच कर्मचाऱ्यांचा पगारदेखील द्यावा लागत आहे. अनेकांनी पाणीपट्टी थकविली आहे. तूर्तास या साठवण टाकीतील शेवाळ व जलपर्णी काढून टाकणे आवश्यक आहे.

या पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीस अनेक ठिकाणी जोडणी दिल्याने गळती होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोशीर पाणीपुरवठा योजनेच्या या समस्यांकडे लक्ष देण्यास ग्रामपंचायतीस वेळ नसल्याने पाणी कमिटीनेही दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे, त्यामुळे साठवण टाकीत साठलेली जलपर्णी आणि शेवाळ काढले नाही तर पोशीर ग्रामस्थांना काही दिवसांत दूषित पाण्याचा सामना करावा लागेल यात शंका नाही.

पोशीरमधील पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर अनेक ठिकाणी गळती लागली होती. त्यामुळे वर्षभर ही योजना पाणी कमिटीच्या ताब्यात दिली आहे. ती कशा प्रकारे चालते पाहण्यासाठी ताब्यात घेतली नव्हती; परंतु या योजनेचा पूर्ण हिशोब पाणी कमिटीने ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिल्यानंतर ही योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घेण्यासंदर्भात आम्ही नियोजन करणार आहोत.
- हरिचंद्र निरगुडा, सरपंच,
पोशीर ग्रामपंचायत

पोशीर आणि चिकणपाडामधील अनेक नळधारकांची पाणीपट्टी थकली आहे, त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. तरी पाणीपुरवठा साठवण विहिरीची पाहणी करून लवकरच टाकीची (विहिरीची) साफसफाई केली जाईल.
- मालू शिंगटे, अध्यक्ष, पोशीर पाणी कमिटी

Web Title: Storage of water supply scheme, well washed in the well, there is no clearance of wells during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.