प्रकाश कदम।
पोलादपूर : कोकणात ३ जून रोजी आलेल्या चक्रीवादळाने किनारपट्टीलगतच्या गावांत होत्याचे नव्हते करून टाकले होते, त्याचप्रमाणे या वादळी वाऱ्याचा फटका पोलादपूर तालुक्याला बसल्याने ७३३ घरे व गोठ्यांचे नुकसान झाले असून, ३६ लाख ९९ हजार ८२९ रुपयांची वित्तहानी झाली आहे. यामध्ये तीन सजा निहाय गावाचे पंचनामे होणे बाकी असल्याने बाधितांची संख्या वाढणार आहे.तालुक्यातील १४ सजा निहाय पंचनामे करण्यात येत असून ११ गावचे पंचनामे करण्यात आले आहेत. या पैकी २ गावचे पंचनामे प्रत्यक्षदाखल झाले असल्याची माहितीप्राप्त झाली आहे. या मध्ये सर्वाधिक नुकसान लोहरे विभागात झाले असून ५६ घरे, गोठे याची सुमारे १७ लाख ६६ हजार ३३५ रुपयांचे नुकसान झाले आहे.
या खालोखाल उमरठ तलाठी सजा अंतर्गत ७६ ठिकाणचे पंचनामे करण्यात आले असून जवळपास १६ लाख ३७ हजार पोलादपूर तलाठी सजा निहाय ५३ नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आले असून १० लाख २ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.तुर्भे बु तलाठी सजा निहाय १३ घरे /गोठा याचे नुकसान झाले असून २९ हजार ८१९ रुपये ,धारवली ३० ठिकाणे नुकसान ७८ हजार रुपये, चांभारगणी बु तलाठी सजा अंतर्गत ६२ जणांचे सुमारे २ लाख ७५ हजार २२०, देवळे तलाठी सजामधील ५५ जणांचे नुकसान झाले असून सुमारे २ लाख ३६ हजार ३८० रुपये तर सर्वाधिक पडझड कोंढवी व कोतवाल बु गावात झाली असून यामध्ये अनुक्रमे १९२ व ११२ जणांचे नुकसान झाले आहे.या गावातील नुकसानग्रस्तांमध्ये काही घराचे पत्रे व कौले उडाली आहेत. कोंढवीमध्ये ७ लाख ६५ हजार ५२५ तर कोतवालमध्ये ४ लाख ९० हजार ५० रुपयांचे नुकसान झाले आहेत.पंचनामे करण्यात अडचणीच्तालुक्यातील तीन तलाठी सजा पळचिल, देवपूर, वाकन येथील पंचनामे बाकी असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यातील घरे/गोठे मिळून एकूण ८३८ ठिकाणी नुकसान झाल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.च्संपूर्ण तालुका दुर्गम असल्याने पाच दिवसांनंतरही पंचनामे करण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच काही गावांतील वीजपुरवठा पाचव्या दिवशी सुरळीत झाल्याने गावातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.