दिघी : गुजरातच्या किनाºयावर धडकणाºया वायू या चक्रिवादळाचा तडाखा श्रीवर्धनमधील किनारपट्टीला बसला आहे. दिघी खाडीतून होणारी दिघी-आगरदांडा ही जलवाहतूक बंद करण्यात आली आहे. वायू चक्रिवादळाचा श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला मोठा फटका बसला असून, समुद्रकिनारी सध्या शुकशुकाट आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांना रोजगार मिळवण्यासाठी मान्सूनपूर्व जून महिन्यातील सुरुवातीचा काही कालावधी महत्त्वाचा असतो. मे महिन्याच्या शेवटच्या दिवसांत पर्यटन हळूहळू वाढू लागते. मुंबई, पुणे साताराहून येणारे पर्यटक दिघी जंगलजेटी मार्गे फेरी बोटीने येतात. यामुळे श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर अशा विस्तीर्ण समुद्रकिनाºयाला पर्यटकांची पसंती राहते. वायू चक्रिवादळाचे राज्यातील संकट टळले असले, तरी वादळामुळे कोकण किनारी भागातील पर्यटनाला फटका बसला आहे. बुधवार दिवसभर ढगाळ वातावरण होते. दिवसा हलक्या व रात्री जोरदार सरी पडल्या. पावसामुळे विद्युतपुरवठा खंडित होता.वादळामुळे समुद्र खवळलेला असून सहा मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमार, पर्यटक, नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. चक्रिवादळ अरबी समुद्रातच घोंगावणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र, त्याचा परिणाम काही प्रमाणात कोकण, गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर जाणवण्याची शक्यता असल्याने कोकणासह अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.प्रवासी जलवाहतूक बंदवादळामुळे बुधवारी दुपारपासून दिघी ते जंजिरा किल्ला व राजपुरी ते किल्ला लाँच तसेच दिघी ते आगरदांडा ही प्रवासी वाहतूकही बंद राहणार असल्याची माहिती दिघी बंदर निरीक्षक प्रकाश गुंजाळ यांनी दिली. पुढील आदेश येईपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.प्रशासनाची सतर्कताच्श्रीवर्धन तहसील विभागाकडून दिघी बंदर परिसरात सतर्कता घेण्यात आली आहे. बुधवारी वादळी पावसामुळे श्रीवर्धन-कार्ले-बोर्लीपंचतन मार्गावर वावेपंचतन येथे वृक्ष कोसळल्याने वाहतूक काही काळ खोळंबली होती. दिवेआगरमधील ग्रामसेवक शंकर मयेकर आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने वृक्ष बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.च्दिघी सागरी पोलिसांकडून सावधानतेचे आवाहन केले जात आहे. वादळामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी खबरदारी घेत असल्याचे दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक डी. टी. सोनके यांनी सांगितले. किनाºयावरील धोका पाहता समुद्रकिनारी पर्यटकांनी जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.