रायगडमध्ये वादळी वाऱ्याचे थैमान, वीजपुरवठा खंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 02:13 AM2020-04-30T02:13:13+5:302020-04-30T02:13:20+5:30
मुरुड, खालापूर, कर्जत तालुक्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून नागरिकांचे नुकसान झाले आहे.
नेरळ : रायगडमध्ये ठिकठिकाणी वादळी पावसासह आलेल्या वाºयाने मोठे नुकसान केले आहे. मुरुड, खालापूर, कर्जत तालुक्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून नागरिकांचे नुकसान झाले आहे.
कर्जत तालुक्यातील कशेळे, पाथरज आणि सावळे भागात बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस आणि सोसायट्याच्या वाºयात अनेक घरांचे पत्रे उडाले असून विजेचे खांब वाकले आहेत. यात अनेकांचे मोठे नुकसान झाले असून दीड महिना कोणतेही कमाईचे साधन नसलेल्या नागरिकांवर आता दुसरे मोठे संकट उभे राहिले आहे. तर विजेचे खांब वाकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात
आला आहे.
कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या कशेळे, सावळे आणि पाथरज भागात बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवकाळीपासून आणि वादळी वाºयात अनेक घरांचे पत्रे उडाली आहेत. त्यात मोठे नुकसान झाले आहेत. कशेळे येथील एका दुकानाचे पत्रे उडाल्याने त्यातील सामानही पूर्ण भिजून गेले आहे. आवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा महसूल विभागाने तत्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त सावळे आणि पाथरज भागातील नागरिकांनी केली आहे.
याचबरोबर मुरुड तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे.
>रोहा-कोलाड रस्त्यावर कोसळले झाड
धाटाव : बुधवारी सायंकाळी अचानक वादळी वाºयासह आलेल्या पावसामुळे रोहा-कोलाड रस्त्यावर रोठखुर्द, सुदर्शन नगरनजीक झाड रस्त्याच्या मधोमध उन्मळून पडले. यामुळे कोलाड व रोहा बाजूकडील वाहतूक ठप्प झाली. यामुळे कामगारांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. अर्ध्या तासाने झाड बाजूला करण्यात आले. कोणतीही जीवितहानी झाली नाही.
>खोपोलीत गारांसह पाऊस
खोपोली : खोपोली व खालापूर तालुक्यात आज सायंकाळी वादळी वाºयासह पडलेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. गारांसह सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी घरांवरचे, शाळांवरचे पत्रे उडाले असून काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पावसाने काही काळ सुखद गारवा निर्माण झाल्याने गेले काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या खोपोलीकरांना थोडासा दिलासा मिळाला.
बुधवारी दुपारपासूनच अंधार झाल्यामुळे पाऊस पडणार, अशी शक्यता होती. ५:४५ वाजता पावसाला सुरुवात झाली. वादळी वारा होता आणि गाराही मोठ्या प्रमाणात पडल्या. लौजी येथे डॉक्टर गुप्ता यांच्या कारवर झाड पडल्याची घटना घडली. तसेच तेथील शाळेवरचे काही पत्रेही उडाले. तालुक्याच्या परिसरातही वादळी वारा आणि गारांसह पाऊस पडला. अनेक ठिकाणी झालेल्या नुकसानीचा प्रशासनाकडून आढावा घेतला
जाणार आहे.