अलिबाग पर्यटन महोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:58 AM2017-12-28T02:58:36+5:302017-12-28T02:58:38+5:30

अलिबाग : अत्यंत उत्साहात साज-या झालेल्या अलिबाग नगरपरिषद व आरडीसीसी बँकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यटन महोत्सवाचा समारोप मंगळवारी संध्याकाळी अलिबागमधील स्थानिक कलाकारांच्या जल्लोषाने झाला.

The story of the Alibaug tourism festival concludes | अलिबाग पर्यटन महोत्सवाची सांगता

अलिबाग पर्यटन महोत्सवाची सांगता

Next

अलिबाग : अत्यंत उत्साहात साज-या झालेल्या अलिबाग नगरपरिषद व आरडीसीसी बँकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यटन महोत्सवाचा समारोप मंगळवारी संध्याकाळी अलिबागमधील स्थानिक कलाकारांच्या जल्लोषाने झाला. अलिबागचा गुणी कलाकार अमोल कापसे यांच्या नृत्याने प्रारंभ झालेल्या या समारोप सोहळ्यात  विक्रांत वार्डे यांची गीते, किरण साष्टे यांचे निवेदन, नटराज डान्स अ‍ॅकॅडमीचे उमेश कोळी, रिदम आर्ट इन्स्टिट्यूूटच्या कलाकारांनी सर्व शिक्षाअभियानातून दिलेला संदेश असे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे कलाविष्कार रंगमंचावर साकारले.
या वेळी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा परिषद सदस्य भावना पाटील, चित्रा पाटील, आरसीएफचे कार्यकारी संचालक एस. के. जावळे, डॉ. ज्योती लाटकर, माजी नगराध्यक्षा सुनीता नाईक, आरडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नगरसेवक प्रदीप नाईक, उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, नगरसेविका सुरक्षा शहा, जगदिश एंटरप्राइजचे दर्शन शहा, सभापती वृषाली ठोसर, पंचायत समिती सदस्य रचना म्हात्रे, नगरसेवक अ‍ॅड. गौतम पाटील, अजय झुंजारराव, सुषमा पाटील, अश्विनी पाटील, महेश शिंदे, राकेश चौलकर, उमेश पवार, प्रिया वेलकर, अनिल चोपडा, विनोद सुर्वे, संजना किर, नईमा सय्यद आदी उपस्थित होते.
आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे हॉटेल व्यावसायिक रमाकांत शिंदे, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे राकेश वारीसे, सिंगापूरच्या धर्तीवर पर्यटन महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या प्रतिमेचे शिल्पकार संजय सारंग, वाळूशिल्पकार मितेश पाटील, वकिली क्षेत्रातील अ‍ॅड. बाळासाहेब पारकर, कार्यकर्ते संदीप गोठवडीकर, वैद्यकीय सेवा क्षेत्रातील डॉ. एस. एन. तिवारी, क्र ीडा क्षेत्रात यतिराज पाटील, सहकारी क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते गिरीश तुळपुळे, अंत्यविधी करिता सामाजिक भावनेतून आपल्या टेंपोसह सक्रिय कार्यरत विश्वास खोत, रायगड जिल्हा रुग्णालयातील डायलेसिस युनिट सेवा देणाºया डॉ. दीपाली देशमुख, महिला उद्योजिका रत्नांजली पेरेकर, अल्पवयात न्यायाधीश पदापर्यंत पोहोचलेल्या अ‍ॅड. कीर्ती काटकर यांना विशेष पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.
>विद्यार्थिनी आणि महिला यांना छेडछाड वा आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दामिनी पथक आणि बिटमार्शल यांचे साहाय्य तत्काळ उपलब्ध होण्याकरिता या दोन्ही सेवांचे फोन विद्यार्थिनी व महिलांना उपलब्ध करून देण्याकरिता ‘लोकमत’, अलिबाग नगरपरिषद आणि रायगड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आला आहे. ‘विद्यार्थिनी-महिला छेडछाड प्रतिबंधक’उपक्रमाचा शुभारंभ या वेळी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: The story of the Alibaug tourism festival concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.