उसरोलीत थेट सरपंचपदासाठी भाजपा विरु द्ध शेकाप सरळ लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 03:43 AM2019-02-06T03:43:46+5:302019-02-06T03:45:47+5:30
मुरुड तालुक्यात तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. या तीन ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रि या सुरु झाली आहे.
मुरुड - मुरुड तालुक्यात तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. या तीन ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रि या सुरु झाली आहे. मुरुड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून उसरोलीची गणना केली जाते. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण ४०८४ मतदाते आहेत. १३ ग्रामपंचायत सदस्यांसह एक थेट सरपंच जनतेमधून निवडून येणार आहे.
या ग्रामपंचायतीवर मागील दहा वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाची एक हाती सत्ता आहे. त्यातच यंदाच्या या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने अनुभवी व पदवीधर उमेदवार मनीष महादेव नांदगावकर यांना थेट सरपंचपदासाठी तिकीट दिले आहे.तर भारतीय जनता पार्टीने तरु ण उमेदवार समीर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकंदर वातावरण पहाता येथे शेकाप राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची आघाडी होणार असून भारतीय जनता पक्ष येथे स्वतंत्र लढणार असून त्यांचा जास्त कल थेट सरपंच पद निवडून आणण्यावर दिला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीमधील ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
खारआंबोली ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सदस्य सर्वाधिक असून येथे एकहाती सत्ता स्थापण्यात ते नेहमी यशस्वी ठरले आहेत. परंतु यंदा येथे थेट सरपंच पदाची निवडणूक पहिल्यांदा होत असून सरपंच पदाचा उमेदवार ते निवडून आणतात काय हे पहावयास मिळणार आहे. येथे सुद्धा शेकाप,राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची आघाडी निर्माण झाली आहे.
अर्ज भरण्याची प्रक्रि या सुरु
मजगाव ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदाची निवडणूक प्रथमच होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असून निकाल अनपेक्षित लागणार असल्याचे सांगत आहेत. मुरूडमधील तिन्ही ग्रा.पं. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रि या सुरु आहे.