आविष्कार देसाईअलिबाग : जगभरात आज भारतातील वैज्ञानिकांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. वैज्ञानिक ही उपाधी लावण्याआधी त्यांनीही आपापल्या शालेय जीवनामध्ये सुरुवातीला विविध वैज्ञानिक प्रदर्शनात इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट सादर केले असतील. त्या माध्यमातून त्यांना प्रेरणा मिळाल्यामुळेच त्यांच्यातील वैज्ञानिक घडला असावा. अलिबाग येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या कल्पक स्वप्नांना बळ देण्यासाठी शालेय स्तरावर ‘आविष्कार २०२०’ हा वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला मोठा इव्हेंट आज पार पडला. तब्बल ७६७ विद्यार्थ्यांनी १३० इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट सादर करून सर्वांचीच मने जिंकली.विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील वैज्ञानिक जागा करून त्यांच्या कल्पनांना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न अलीकडे होताना दिसत आहे. अलिबागमधील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमधील व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करण्यासाठी ‘आविष्कार २०२०’ असा अभिनव उपक्रम राबवला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांनी प्रोत्साहित केले. गेला महिनाभर विद्यार्थी आपापल्या प्रोजेक्टच्या तयारीसाठी मेहनत घेत होते. शुक्रवारी सकाळी ‘आविष्कार २०२०’ चे उद्घाटन पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सिस्टर शार्लेट, शाळेच्या व्यवस्थापिका सिस्टर जॉली, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट तयार करताना त्यामध्ये एकाच विद्यार्थ्याने सहभागी न होता ग्रुपने तो प्रोजेक्ट तयार करावा असा उद्देश होता. त्यामुळे त्यांच्यातील उत्तम टिमवर्कचेही दर्शन झाले. प्रोजेक्टबद्दल प्रेझेंटेशन देताना त्यांच्यातील आत्मविश्वास हा वाखणण्या जोगा होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रोजेक्ट हे नामवंत वैज्ञानिकांच्या तोडीस नसतील, मात्र आपण काही तरी वेगळे केल्याचे समाधान आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.प्रोजेक्ट पाहण्यासाठी पालंकासह अन्य नागरिकांनी शाळेमध्ये प्रचंड गर्दी केली होती. आपल्या पाल्यानी काही तरी इनोव्हेटिव्ह केले आहे आणि त्यांचे सर्वच कौैतुक करत असल्याचे पाहून पालकांच्या चेहºयावरही आनंदाची लहर अनुभवता आली.विद्यार्थ्यांना आम्ही कोणतेच विषय दिले नव्हते, तसेच त्यांची टिम त्यांनीच निवडली होती. त्यामुळे त्यांच्याकडून काही तरी चांगले बाहेर आले असल्याचे त्यांच्या शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.>पर्यावरण रक्षणासाठी इकोफ्रेंडली शेती करण्याचा संदेशइयत्ता सहावी ते अकरावीच्या तब्बल ७६७ विद्यार्थ्यांनी १३० प्रोजेक्ट सादर केले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांमुळे त्यांच्या कल्पनाशक्तीला दाद देण्यावाचून उपस्थितांना पर्यायच राहिलेला नसल्याचे दिसत होते. पर्यावरण रक्षणासाठी इकोफ्रेंडली शेती कशी करावी, सोलर, अनुऊर्जा वापराच्या माध्यमातून ऊर्जेची बचत करणे, भारताची चांद्रयान मोहीम यांनी तर सर्वांचे लक्ष वेधलेच शिवाय भारताचा स्वातंत्र्यपूर्व काळातील साकारलेल्या प्रतिकृतींनी सर्वांचीच मने जिंकली. इंग्रजी, मराठी, हिंदीमधील व्याकरणाच्या सोप्या पद्धती, सोरर बोट, शाडूच्या मातींच्या मूर्ती बनवणे, बँकेचेव्यवहार कसे चालतात, शेतीचे चक्र, उपग्रहांची माहिती यासह अन्य प्रोजेक्टचा समावेश होता.
छोट्या वैज्ञानिकांच्या स्वप्नांना बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:29 AM