अलिबाग : वर्षा पर्यटन, गडकिल्ले, वनभ्रमंती आणि गिर्यारोहणासाठी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी व संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या पर्यटक सुरक्षा उपायांची यंत्रणेने अंमलबजावणी करावी, तसेच पर्यटनस्थळी व सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणा-या तळीरामांवर कडक कारवाई करावी, असे आदेश रायगडचे प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी शुक्रवारी दिले आहेत.मान्सून पर्यटनाच्या काळात पर्यटक धबधबे, समुद्र किनारे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात. उत्साहाच्या भरात पर्यटक नको त्या संकटात सापडून प्रसंगी प्राणाला मुकतात. अशा दुर्घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी करणाºया यंत्रणांची आढावा बैठक यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहअधीक्षक सीमा झावरे, रोहा उप वन संरक्षक राकेश शेपट, अलिबाग उपवन संरक्षक मनीष कुमार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील पर्यटनस्थळी पोलीस विभाग, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांची संयुक्त पथके तयार करून गस्त वाढविणे, धबधबे तसेच अन्य पर्यटन स्थळी मद्यपान करण्यास प्रतिबंध करणे यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग पोलीस विभागाच्या सहयोगाने अंमलबजावणी करेल. तसेच धबधबा व परिसरात मद्य विक्री व साठा करणाºयांविरु द्धही कारवाई करण्यात येईल. पर्यटन स्थळे व धबधबे यांच्या परिसरात सुरक्षित अंतरावर वाहने पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस विभाग आपापल्या कार्यक्षेत्रात अंमलबजावणी करेल. पर्यटकांना सावधगिरीचा इशारा देण्यासाठी चिन्हांकित माहिती फलक हे संबंधित उपविभागीय अधिकाºयांनी लावावेत असे आदेश देण्यात आले आहेत.पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धबधबा परिसरात तत्कालीन परिस्थितीचा विचार करु न उपविभागीय अधिकारी जमाबंदीचे आदेश निर्गमित करतील. जिल्ह्यात प्रबळगड, ईशाळगड, पेठ किल्ला आदी ठिकाणी ट्रेकिंग व साहसी पर्यटनासाठी येणाºया पर्यटकांनी संबंधित उपवनसंरक्षकांकडे आपली नाव नोंदणी करावी, त्यासाठी उपवनसंरक्षकांनी पर्यटकांना वन क्षेत्राच्या प्रवेश ठिकाणी नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. स्थानिक तरुणांना गाइडचे प्रशिक्षण देऊन पर्यटकांचा ट्रेकिंगसाठी गाइड नेणे बंधनकारक करावे जेणे करून स्थानिक तरूणांना रोजगार उपलब्ध होईल व पर्यटक भरकटणार नाहीत, यासाठी उपविभागीय अधिकारी आणि उपवनसंरक्षक यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात उपाययोजना करावी, तसेच धोक्याच्या ठिकाणी, जलाशये, समुद्र किनारे आदी ठिकाणी जीवरक्षक तयार करून त्यांना पोषाख व ओळखपत्र देण्यात यावे अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी यावलकर यांनीकेल्या.
पर्यटक सुरक्षा उपायांची होणार कडक अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 2:51 AM