रोहा तालुक्यात जुलाब, उलट्यांची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2015 02:58 AM2015-08-18T02:58:17+5:302015-08-18T02:58:17+5:30
तालुक्यातील झोळांबे, लक्ष्मीनगर गावांत जुलाबाची साथ आली आहे. जुलाब, उलट्यांनी रुग्ण हैराण आहेत. बहुतांशी रु ग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत
रोहा : तालुक्यातील झोळांबे, लक्ष्मीनगर गावांत जुलाबाची साथ आली आहे. जुलाब, उलट्यांनी रुग्ण हैराण आहेत. बहुतांशी रु ग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. या रुग्णांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता असून ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले असताना प्रतिबंधात्मक औषधांचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
करोडो रुपये खर्च करु न रोहा उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत यंत्रणा आणि डॉक्टर्स स्टाफविना कायम बंद आहे तर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर्स, स्टाफ व औषधांच्या तुटवड्याने निस्तेज झाले आहे. तालुक्यातील लक्ष्मीनगर, झोळांबे व अन्य गावात मलेरिया, टायफॉईड साथीची लागण झाली आहे. यातील बहुतांश रुग्ण ग्रामीण
रुग्णालयात न जाता खाजगी दवाखान्यात जात असल्याने अधिकृत आकडा समोर येत नाही. त्यातच आता जुलाब, उलटीच्या साथीने डोके वर काढले आहे. लक्ष्मीनगर, झोळांबे गावांतील अनेकांना जुलाबाच्या साथीने ग्रासले आहे. त्यातील अनेक रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता औषधांचा तुटवडा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश ताडकर, रमाकांत चौलकर, गणेश चावरेकर, स्वप्निल दाभाडे, रूपेश दाभाडे आदींनी नाराजी व्यक्त करून रूग्णालय अधीक्षकांना औषधे व अनास्थेबद्दल निवेदनपत्र दिले आहे. (वार्ताहर)