पाली : सुधागड तालुक्यातील ग. बा. वडेर हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.८ आॅगस्ट रोजी दुपारी ४ च्या सुमारास सुएसोच्या जे.न. पालीवाला महाविद्यालयात राष्ट्रवादी आयोजित मंगळागौरीचा कार्यक्र म सुरु असताना ढोलकीचा आवाज झाल्याने १० वीच्या वर्गात बसलेला प्रणीत महेश शिंदे याच्या अंगात येण्याचा प्रकार घडला. अंगात आल्याने तो बसलेल्या ठिकाणी लोळू लागला. हा प्रकार मुख्याध्यापक अजय पाटील यांना कळला असता त्यांनी दहावीच्या वर्गात येऊन प्रणीत शिंदे याला मारहाण करण्यास सुरु वात केली व ही अंधश्रद्धा असून असले थोतांड बंद कर असे सांगितले. मारहाण केलेला विद्यार्थी हा त्याच अवस्थेत घरी गेला असता त्याला वेदना होऊ लागल्याने त्याने दवाखाना गाठला. यानंतर विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे पालक व नातेवाइकांनी अंगात येणे हे जर अंधश्रद्धा असेल किंवा नसेल, मात्र विद्यार्थ्याला मारण्याचा अधिकार मुख्याध्यापकाला कोणी दिला असा संतप्त प्रश्न केला आहे.मुख्याध्यापकाचे निलंबन व्हावे याकरिता जिल्हा शिक्षण अधिकाºयांना निवेदन देणार असून त्यांच्या या आंदोलनात बहुजन विद्यार्थी संघटना सामील होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हळ यांनी सांगितले.अंगात येणे असे प्रकार म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा असून आमच्या शाळेत ८ आॅगस्ट रोजी असाच प्रकार घडला. या प्रकरणातील विद्यार्थ्याला मी समजावून सांगत असताना एक कानशिलात मारली, परंतु बेदम मारहाण केल्याचा आरोप खोटा आहे.- अजय पाटील, मुख्याध्यापक, ग.बा.वडेर हायस्कूल, पालीविद्यार्थ्यांना मारहाण होणे असे प्रकार सर्रासपणे सु.ए.सो.च्या शाळांमध्ये नेहमी घडत असतात. मात्र हे प्रकार दाबले जातात. विद्यार्थ्यांना मारहाण करणे हा फौजदारी गुन्हा आहे. मात्र पोलीस या प्रकारात केवळ तक्र ार नोंद करून सोपस्कार उरकतात. विद्यार्थ्याला मारहाण करणाºया मुख्याध्यापकाचे निलंबन करण्यात यावे, नाहीतर शिवसेना स्टाईलने यांना उत्तर दिले जाईल.- प्रकाश देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख रायगडविद्यार्थी चुकला तर त्याला समजून सांगणे हे शिक्षकाचे काम आहे, परंतु त्याला बेदम मारहाण करणे ही बाब निंदनीय आहे. ग. बा. वडेरमधील असे प्रकार थांबले पाहिजेत.- राजेश मपारा, भारतीय जनता पार्टी ,सुधागडपाली ग.बा.वडेर हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी अजय पाटील हे आल्यापासून शाळेत ते दादागिरी करून हम करोसो कायदा असे करीत असून त्यांचे त्वरित निलंबन करण्यात यावे, नाहीतर आरपीआय आंदोलन छेडेल.- भगवान शिंदे, कार्याध्यक्ष आरपीआय सुधागड
विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 6:06 AM