‘मध्यान्ह भोजन’ ११ कोटींचा निधी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 01:11 AM2017-07-28T01:11:23+5:302017-07-28T01:11:28+5:30

मध्यान्ह भोजनासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे ११ कोटी ८७ लाख ८ हजार रु पयांचा निधी शिल्लक आहे. त्यामुळे कोणत्याही शाळेमधील विद्यार्थी दुपारच्या भोजनावाचून वंचित राहणार नाही, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.

students 11 crores fund balance | ‘मध्यान्ह भोजन’ ११ कोटींचा निधी शिल्लक

‘मध्यान्ह भोजन’ ११ कोटींचा निधी शिल्लक

Next

आविष्कार देसाई 
अलिबाग : मध्यान्ह भोजनासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे ११ कोटी ८७ लाख ८ हजार रु पयांचा निधी शिल्लक आहे. त्यामुळे कोणत्याही शाळेमधील विद्यार्थी दुपारच्या भोजनावाचून वंचित राहणार नाही, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची बैठक शुक्र वारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे. जिल्ह्यात कोठेही शालेय पोषण आहाराबाबत काही तक्र ारी असल्यास त्यांची दखल या बैठकीत घेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
शालेय पोषण आहार ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. राज्यात ही योजना २२ नोेव्हेंबर ११९५ पासून राबविण्यात येत आहे. सुरु वातीला या योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना महिन्याला तीन किलोप्रमाणे मोफत तांदूळ देण्यात येत होता. २००१मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा तांदूळ न देता, शाळेमध्ये अन्न शिजवून द्यावे, असे आदेश दिले. त्यानुसार २००२ पासून या योजनेचे स्वरूप बदलून घरी तांदूळ देण्याऐवजी विद्यार्थ्यांना शाळेमध्येच शिजवलेला आहार देण्यात येतो. २००८ मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येतो.
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण करणे, पटनोंदणी आणि उपस्थितीचे प्रमाण वाढविणे, विद्यार्थ्यांची गळती थांबविणे, भेदभाव नष्ट करणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, ही या योजनेची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
एवढे सगळे करूनही गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी गळतीचा आकडा थांबला आहे. पटसंख्या वाढण्याच्या आकडेवारीमध्ये शेकडोच्या संख्येने वाढ होत असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी या वेळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पटसंख्या वाढीमध्ये शालेय पोषण आहाराबरोबरच अन्य बाबीही कारणीभूत असल्याचे शेषराव बडे यांनी सांगितले.

समितीवर विद्यार्थ्यांचे पालक
केंद्रीय मंत्री अनंत गीते हे केंद्राच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी शुक्र वारी रायगडमध्ये येणार आहेत. त्या बैठकीमध्ये विविध तक्र ारींची ते दखल घेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. शालेय पोषण आहारामध्ये काही ना काही
तक्र ारी येण्याचे प्रमाण हे सुरूच असते. त्यामुळे शालेय पोषण आहार समितीवर विद्यार्थ्यांच्या पालकांनाच घेतले जाते.
त्यांनीच आपल्या मुलांना चांगला, पोषक आणि स्वच्छ आहार कसा मिळेल, हे पाहायचे आहे. त्यामुळे तक्र ारी येण्याचा प्रश्नच राहिलेला नाही.
त्या उपरही काही तक्र ारी आढळल्यास शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यास त्यावर तातडीने कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: students 11 crores fund balance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.