विद्यार्थ्यांच्या नशिबी ‘पडघे’च

By admin | Published: July 10, 2015 12:22 AM2015-07-10T00:22:15+5:302015-07-10T00:22:15+5:30

कोणत्याही परिस्थितीत जून महिन्यापर्यंत पडघे येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाकरिता पर्यायी जागा मिळवून देऊ, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्र्यांनी दिले होते

The students 'fall' | विद्यार्थ्यांच्या नशिबी ‘पडघे’च

विद्यार्थ्यांच्या नशिबी ‘पडघे’च

Next

पनवेल : कोणत्याही परिस्थितीत जून महिन्यापर्यंत पडघे येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाकरिता पर्यायी जागा मिळवून देऊ, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्र्यांनी दिले होते. मात्र जून महिना उलटला तरी आश्वासनपूर्ती न झाल्याने ते हवेतच विरले की काय, अशा प्रश्न आदिवासी मुलांकडून विचारण्यात येत आहे.
पडघेतील वसतिगृहाला पाचशे विद्यार्थ्यांची मान्यता असल्याने त्याकरिता मोठ्या जागेची गरज आहे. त्यामुळे २०१० साली पडघे-कोळीवाडा येथे एकूण ९ हजार चौरस फूट जागेवर आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू करण्यात आले. पडघे येथील वसतिगृहात प्रशस्त खोल्या, चोवीस तास पाणी, मोकळी हवा या सर्व पोषक गोष्टी आहेत. मात्र हे ठिकाण पनवेलपासून दूर पडते. शिवाय वाहतुकीसाठी गैरसोयीचे आणि आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी वसतिगृह दुसऱ्या ठिकाणी हलविण्याची तयारी प्रकल्प अधिकाऱ्यांनी एक वर्षापूर्वीच केली आहे. विद्यार्थ्यांकडूनही तशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. तत्कालीन गृहपालांनी विद्यार्थी प्रतिनिधींना बरोबर घेऊन कामोठे, खारघर, आकुर्ली, पनवेल, करंजाडे या ठिकाणी इमारती पाहिल्या. मात्र शासकीय वसतिगृह असल्याने अनेकांनी जागा देण्यास नकार दिला. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी जूनमध्ये वसतिगृह नवीन जागेत शिफ्ट होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तता न झाल्याने पुन्हा आंदोलन होण्याचे चिन्ह आहे.

Web Title: The students 'fall'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.