कर्जत : तालुक्यातील कडाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या गावांमधील गावठी दारूचे अड्डे बंद करण्याची मागणी महिलांनी केली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी तब्बल ७४५ विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि दारू आरोग्यास कशी धोकादायक आहे, यासाठी जनजागृती फेरी काढली. दारूबंदीसाठी कडाव परिसरातील २५ शिक्षकांनी पुढाकार घेतला असून दारूबंदीसाठी गावांतील तरुणवर्ग टेहळणी करणार आहे. कडाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुदाम पवाळी यांनी दारु बंदीसाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या गावांतील उद्ध्वस्त होत असलेली अनेक कुटुंबे आणि त्या कुटुंबांवर पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये म्हणून दारु बंदीसाठी पुढाकार घेत आहेत. असंख्य महिलांना दारूबंदीसाठी एकत्र केले असून दारूबंदीसाठी येथील महिलांनी एल्गार पुकारला आहे. केवळ गावठी दारूचे गुत्ते बंद करण्यासाठी महिलांनी आग्रह धरला नसून हद्दीतील अन्य प्रकारच्या दारू, ताडी-माडी यांची विक्र ी देखील बंद करण्यासाठी मोठा आग्रह असताना आता तरु णवर्ग देखील या आंदोलनात उतरु पहात आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे आणि तेथील इंग्रजी शाळेत शिकणारे असे तब्बल ७४५ विद्यार्थ्यांनी कडावमध्ये दारूबंदी व्हावी यासाठी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केले. २५ शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी भव्य जनजागृती फेरी काढली, विद्यार्थ्यांच्या मदतीला मोठ्या प्रमाणात तरु ण देखील दारु बंदीसाठी रस्त्यावर उतरल्याने कडावमध्ये सर्वत्र दारु बंदीसंबंधी घोषणा ऐकायला मिळत होत्या. त्या घोषणांचा आवाज सर्वदूर पोहचला असल्याने येथे होऊ घातलेली दारुबंदी कायमची होईल, असा विश्वास सुदाम पवाळी यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)
दारूबंदीसाठी विद्यार्थी सरसावले
By admin | Published: January 22, 2016 2:18 AM