विद्यार्थ्यांनी पोलिसांचे मित्र बनावे
By admin | Published: January 11, 2016 02:04 AM2016-01-11T02:04:25+5:302016-01-11T02:04:25+5:30
पोलीस आणि नागरिकांचे संबंध सौहार्दाचे असले, तर सहकार्याची भूमिका कायम अबाधित राहते. यासाठीच ‘पोलीस मित्र’ संकल्पना नव्याने राबविली जात
नागोठणे : पोलीस आणि नागरिकांचे संबंध सौहार्दाचे असले, तर सहकार्याची भूमिका कायम अबाधित राहते. यासाठीच ‘पोलीस मित्र’ संकल्पना नव्याने राबविली जात असून प्राध्यापक तसेच विद्यार्थीवर्गाने यात सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक बाळासाहेब दरेकर यांनी केले. रेझिंग डे सप्ताहाचे निमित्ताने येथील कोएसोच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना दरेकर बोलत होते.
यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस दल वापरीत असलेली अत्याधुनिक शस्त्रसामग्री हाताळण्यात देण्यात येवून त्यांच्या कार्याबाबतची माहिती देण्यात आली. पोलीस मित्र ग्रुपमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक तसेच सणासुदीच्या दरम्यान पोलीस दलाबरोबर बंदोबस्त करण्याची संधी मिळणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कार्यक्र मात पोलिसांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत ५० विद्यार्थी यावेळी ‘पोलीस मित्र’ चे सदस्य झाले. यावेळी प्राचार्य डॉ. संदेश गुरव, उपनिरीक्षक रामेश्वर दराडे, प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, हे.कॉन्स्टेबल स्वाती पालवे,अभिनव मगर, दुष्यंत जाधव आदींसह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)