-कांता हाबळेनेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आदिजन विद्या प्रसारक मंडळाच्या भाऊसाहेब राऊत विद्यालयाला अनेक वर्षांपासून संरक्षण भिंत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चिंचवली ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापनाच्या वादामुळे संरक्षक भिंतीचे काम रखडल्याचे समोर आले आहे. या वादात सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.कर्जत-कल्याण या राज्यमार्गाला लागून असणाऱ्या कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारी माननीय भाऊसाहेब राऊत विद्यालय ही शाळा सध्या चर्चेच विषय बनली आहे. १९८१ मध्ये शाळेची स्थापना झाली आहे, तेव्हापासून आजपर्यंत शाळेला संरक्षण भिंत बांधण्यात आलेली नाही. शाळेच्या स्थापनेपासून ते आजतागायत सुमारे ३५ वर्षे शाळेला कुठल्याही प्रकारची संरक्षक भिंत नाही, त्यामुळे शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेत सध्या शिशु वर्गापासून बारावीपर्यंत सुमारे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत शाळा व्यवस्थापनाने कुठल्याही प्रकारची काळजी घेतल्याचे दिसत नाही.शाळेच्या समोर कर्जत-कल्याण राज्यमार्ग असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शाळा सुटण्याच्या वेळेला सर्व विद्यार्थी राज्यमार्गावर येत असल्याने भरधाव येणाºया वाहनांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा प्रशासनाने सकारात्मक विचार करून या शाळेला लवकरात लवकर संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी होत आहे.शाळेची कुंपण भिंत बांधण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत, यासाठी मोजमाप केले आहे. ८० मीटर लांबीची भिंत बांधून एक प्रवेशद्वार ठेवण्यात येणार आहे, चिंचवली ग्रामपंचायतीच्या काही अडचणी येत आहेत, त्या सोडवून भिंत पूर्ण केली जाईल.- पी. डी. वखारकर, मुख्याध्यापक, भाऊसाहेब राऊत विद्यालयचिंचवली ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाºयांच्या मान्यतेने १५ वर्षांच्या कराराने जी जागा शाळेसाठी दिली होती. त्यांनी त्या वेळेसच कुंपण करणे आवश्यक होते. आता कुंपण भिंत बांधताना कल्याण-कर्जत राज्यमार्ग आणि शाळेचे कुंपण यामध्ये पालकांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी जागा सोडावी, तसेच शिशु मंदिराजवळ असणारी अतिरिक्त जागा ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, तसेच अन्य शासकीय कार्यालयाच्या उभारणीसाठी ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावी. ही अतिरिक्त जागा सोडून कुंपण भिंत बांधण्यास कोणाची हरकत नाही.- रामदास भगत, सदस्य, चिंचवली ग्रामपंचायत
विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:30 AM