उपजिल्हा रुग्णालयाचा गलथान कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:57 AM2018-04-09T02:57:20+5:302018-04-09T02:57:20+5:30

कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात प्रशासनास अपयश आले आहे. रुग्णालयामध्ये बेडशीटही नसल्याचे निदर्शनास आले असून या गलथान कारभाराविषयी लोकप्रतिनिधींनी प्रशासनास धारेवर धरून कारवाईची मागणी केली आहे.

Sub-district hospital administration | उपजिल्हा रुग्णालयाचा गलथान कारभार

उपजिल्हा रुग्णालयाचा गलथान कारभार

Next

कर्जत : कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात प्रशासनास अपयश आले आहे. रुग्णालयामध्ये बेडशीटही नसल्याचे निदर्शनास आले असून या गलथान कारभाराविषयी लोकप्रतिनिधींनी प्रशासनास धारेवर धरून कारवाईची मागणी केली आहे.
तालुक्यातील रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे, परंतु याठिकाणी चांगल्या सुविधा देण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. ५0 खाटांचे रुग्णालय असणाऱ्या या रुग्णालयात ताप थंडी आणि किरकोळ आजार या पलीकडे कोणताच उपचार मिळत नाहीत. योग्य सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना उल्हासनगर, मुंबई, नवी मुंबई आदी ठिकाणी उपचारासाठी पाठविण्यात येते. ७ एप्रिलला अनंत काका जोशी प्रतिष्ठानच्यावतीने उपजिल्हा रु ग्णालयातील रु ग्णांना फळे वाटप करण्याचा कार्यक्र म ठेवण्यात आला होता. रु ग्णालयातील रु ग्णांच्या बेडवर बेडशीट नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. वॉर्डात दाखल असलेल्या रु ग्णांनी गेली १५ दिवस झालेत अद्याप बेडशीट टाकले नाहीत असे सांगितले. त्यावेळी नगरसेविका सुवर्णा जोशी यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला व प्रभारी वैद्यकीय अधीक्षक संजीव धनेगावे यांच्याकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी मी संबंधितांना बेडशिट टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे सांगितले.
वॉर्डात दाखल असलेल्या रु ग्णांनी बेडवर बेडशिट नाही, अंगावर चादर मिळत नाहीत काही बोलायला गेले तर येथील कर्मचारी अंगावर ओरडतात अशा एक नाही अनेक तक्र ारी केल्या. त्यावेळी युवासेनेचे जिल्हा अधिकारी मयूर जोशी यांनी डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांची चांगलीच कानउघाडणी केली. रु ग्णांची सेवा करण्याचा शासन तुम्हाला पगार देत आहे हे लक्षात ठेवा असे सांगितले. दरम्यान, नगरसेविका सुवर्णा जोशी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांना रु ग्णालयातील प्रकाराबाबत भ्रमणध्वनीवरून कळवले. युवासेना जिल्हा अधिकारी मयूर जोशी व नगरसेविका सुवर्णा जोशी यांनी रुग्णालयाच्या कारभाराविषयी अधीक्षक डॉ. धनेगावे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
>रु ग्णालयाबाबत अनेक
तक्र ारी आहेत आणि अनेक वेळा शासनाकडे तक्र ारी करून सुद्धा उपजिल्हा रु ग्णालयाच्या कारभारात सुधारणा होत नाहीत
- सुवर्णा जोशी,
नगरसेविका
बेडवर बेडशीट टाकण्याच्या सूचना मी सकाळीच संबंधितांना दिल्या होत्या.
- डॉ. संजीव धनेगावे,
प्रभारी अधीक्षक
५0 खाटांचे रुग्णालय असणाºया या रुग्णालयात ताप थंडी आणि किरकोळ आजार या पलीकडे कोणताच उपचार मिळत नाहीत. योग्य सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना उल्हासनगर, मुंबई, नवी मुंबई आदी ठिकाणी उपचारासाठी पाठविण्यात येते. ७ एप्रिलला अनंत काका जोशी प्रतिष्ठानच्यावतीने उपजिल्हा रु ग्णालयातील रु ग्णांना फळे वाटप करण्याचा कार्यक्र म ठेवण्यात आला होता. रु ग्णालयातील रु ग्णांच्या बेडवर बेडशीट नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

Web Title: Sub-district hospital administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.