उपशिक्षकावर गुन्हा दाखल
By Admin | Published: September 9, 2015 11:01 PM2015-09-09T23:01:19+5:302015-09-09T23:01:19+5:30
सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा पत्र्याची ठाकूरवाडी येथील एका उपशिक्षकाने बनावट कागदपत्रे बनवून चक्क राज्यमंत्री गृह ग्रामीण व त्यांचे खाजगी सचिव यांच्या
पाली : सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा पत्र्याची ठाकूरवाडी येथील एका उपशिक्षकाने बनावट कागदपत्रे बनवून चक्क राज्यमंत्री गृह ग्रामीण व त्यांचे खाजगी सचिव यांच्या खोट्या सह्या करून वेतन व भत्ते लाटल्याचे उघडकीस आले. त्या उपशिक्षकाच्या विरोधात पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी गटशिक्षणाधिकारी
जे. बी. काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुधागड तालुक्यात जिल्हा परिषद शाळा पत्र्याची ठाकूरवाडी येथील उपशिक्षक पदावर असणाऱ्या अंकुश भगत यांनी १५ जानेवारी २०१४ ते १ आॅगस्ट २०१५ या कालावधीत राज्यमंत्री गृह ग्रामीण यांचे सहीचे व त्यांच्या कार्यालयात स्वीय सहाय्यक अर्जुन गुंड व अविनाश रणखांब यांच्या स्वाक्षरीचे कार्यालयात सादर केलेली कागदपत्रे बनावट बनवली. तसेच त्यावर खोटी सही करून पाली पंचायत कार्यालय सुधागड येथे दिले. त्यांच्या पदाचे वेतन व भत्ते कार्यालयाकडून प्राप्त करून शासनाची फसवणूक केल्याने पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून शासनाची फसवणूक केल्याची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)